Congress Toolkit Leak : संबित पात्रांनी पुराव्यानिशी सांगितले कोणी बनवली टूलकिट! काँग्रेसने भ्रम पसरवल्याचा आरोप

Congress Toolkit Leak Sambit Patra Revels Author Name Of Toolkit via Tweeter

Congress Toolkit Leak : कोरोना महामारीच्या संकटातून देश जात असतानाच टोकाचे राजकारणही सुरू आहे. मंगळवारी भाजपने काँग्रेसवर टूलकिटच्या माध्यमातून महामारीवरून पीएम मोदी व देशाची बदनामी करत असल्याचा आरोप केला. तथापि, काँग्रेसने हे आरोप फेटाळून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी या टूलकिट निर्मितीत कोणाचा हात आहे, हे जगापुढे आणले. संबित पात्रा यांनी टूलकिट निर्मितीशी संबंधित पुरावेच आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केले आहेत. Congress Toolkit Leak Sambit Patra Revels Author Name Of Toolkit via Tweeter


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटातून देश जात असतानाच टोकाचे राजकारणही सुरू आहे. मंगळवारी भाजपने काँग्रेसवर टूलकिटच्या माध्यमातून महामारीवरून पीएम मोदी व देशाची बदनामी करत असल्याचा आरोप केला. तथापि, काँग्रेसने हे आरोप फेटाळून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी या टूलकिट निर्मितीत कोणाचा हात आहे, हे जगापुढे आणले. संबित पात्रा यांनी टूलकिट निर्मितीशी संबंधित पुरावेच आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केले आहेत.

बुधवारी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केले की, कॉंग्रेस काल विचारत होते की टूलकिटचा निर्माता कोण आहे, तर आता कागदपत्रांची प्रॉपर्टी तपासा. लेखक – सौम्या वर्मा, आता या सौम्या वर्मा कोण आहेत, पुरावे ग्वाही देतात. यावर आता सोनिया गांधी, राहुल गांधी उत्तर देतील काय?

संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटसह काही छायाचित्रेही शेअर केली आहेत, ज्यात सौम्या वर्मा यांची काँग्रेस नेत्यांसह छायाचित्रे आहेत. यातील एक फोटो राहुल गांधींसोबतही आहे. यासोबतच लिंक्डइन प्रोफाइल शेअर करून दावा करण्यात आला आहे की, सौम्या वर्मा, काँग्रेसचे नेते राजीव गौडा यांच्या ऑफिसमध्ये काम करतात.

काँग्रेसच्या टूलकिटविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका

टूलकिटचा हा वाद आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला आहे. केंद्र सरकारने कॉंग्रेसच्या टूलकिटची प्राथमिक चौकशी करावी, जर कोणी दोषी आढळल्यास यूएपीएअंतर्गत कारवाई करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शशांक शेख झा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

कॉंग्रेसने भाजपाचे आरोप फेटाळले होते

मंगळवारी जेव्हा भाजपने टूलकिटबाबत आरोप केला तेव्हा पहिले उत्तर राजीव गौडा यांच्याकडून आले. ज्यात त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे सांगितले होते. त्यांच्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला.

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनीही भाजपवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, खोटे बोलण्याऐवजी कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचवेळी राहुल गांधींनी असेही म्हटले होते की, कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर लक्ष दुसरीकडे वळविणे, खोटे पसरवणे, ओरड करून तथ्य लपवणे या धोरणांवर केंद्र सरकार काम करत आहे. तथापि, संबित पात्रा यांनी शेअर केलेल्या पुराव्यांवर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Congress Toolkit Leak Sambit Patra Revels Author Name Of Toolkit via Tweeter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात