Coronavirus Cases in India Today 19 May Know Todays Corona Updates And Latest News

Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू

Coronavirus Cases in India : भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंनी जागतिक उच्चांक गाठला आहे. आजपर्यंत एकाच दिवसात अमेरिकेत सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद होती, परंतु आता भारताने हा विक्रम मोडला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,67,334 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि 4529 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी कोरोनातून 3,89,851 जण बरे झाले आहेत. यापूर्वी अमेरिकेत 12 जानेवारी रोजी जगात सर्वाधिक 4468 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. Coronavirus Cases in India Today 19 May Know Todays Corona Updates And Latest News


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंनी जागतिक उच्चांक गाठला आहे. आजपर्यंत एकाच दिवसात अमेरिकेत सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद होती, परंतु आता भारताने हा विक्रम मोडला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,67,334 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि 4529 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी कोरोनातून 3,89,851 जण बरे झाले आहेत. यापूर्वी अमेरिकेत 12 जानेवारी रोजी जगात सर्वाधिक 4468 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

18 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 कोरोना डोस देण्यात आले आहेत. काल 13 लाख 12 हजार 155 डोस देण्यात आले. त्याचबरोबर आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी 20.08 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, याचा पॉझिटिव्हिटी दर 13 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कोरोनाची देशातील सद्य:स्थिती

एकूण कोरोना रुग्ण – 2 कोटी 54 लाख 96 हजार 330
एकूण बरे झालेले – 2 कोटी 19 लाख 86 हजार 363
एकूण सक्रिय रुग्ण – 32 लाख 26 हजार 719
एकूण मृत्यू – 2 लाख 83 हजार 248
देशातील कोरोनाचा मृत्यू दर 1.10 टक्के आहे, तर बरे होण्याचा दर 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सक्रिय प्रकरणे 13 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण लोकांच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

आतापर्यंत दोन टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येला कोरोना

आतापर्यंत कोरोनामुळे भारतातील एकूण लोकसंख्येच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी लोक प्रभावित झाले आहेत. 98 टक्के लोकसंख्या अद्यापही संक्रमणास बळी पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी सरकारने ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात संसर्गाची नोंद झाली नसली तरीही आम्ही लोकसंख्येच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. कोविड-19 मुळे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 1.8 टक्के लोक प्रभावित झाले आहेत, उर्वरित 98 टक्के लोकसंख्येला अद्याप धोका आहे.

Coronavirus Cases in India Today 19 May Know Todays Corona Updates And Latest News

महत्त्वाच्या बातम्या