Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा

PM Modi To Visit Gujrat And div to Riview Damage By Cyclone Tauktae

Cyclone Tauktae : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून रवाना होणार आहेत. भावनगरला पोहोचल्यावर तेथून उना, दीव, जाफराबाद आणि महुवाचे हवाई सर्वेक्षण करतील. तेथून परत आल्यावर अहमदाबादमध्ये एक आढावा बैठक घेणार आहेत. गुजरातमध्ये ‘तौकते’ चक्रीवादळामुळे कमीत-कमी 13 जणांचा मृत्यू झाला, तर वादळामुळे बर्‍याच भागांत मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. PM Modi To Visit Gujrat And diu to Review Damage By Cyclone Tauktae


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून रवाना होणार आहेत. भावनगरला पोहोचल्यावर तेथून उना, दीव, जाफराबाद आणि महुवाचे हवाई सर्वेक्षण करतील. तेथून परत आल्यावर अहमदाबादमध्ये एक आढावा बैठक घेणार आहेत. गुजरातमध्ये ‘तौकते’ चक्रीवादळामुळे कमीत-कमी 13 जणांचा मृत्यू झाला, तर वादळामुळे बर्‍याच भागांत मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

गुजरातेत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे नुकसान

कमकुवत होण्याआधी सोमवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये तौकते चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडला आणि या कालावधीत वेगवान वादळाने कित्येक खांब आणि झाडे उन्मळून पडली. घरांचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने सांगितले की, तौकते चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर “अत्यंत गंभीर चक्रीवादळ” होते. कमकुवत होत हळूहळू “तीव्र चक्रीवादळ वादळा”मध्ये बदलले आणि आता ते “चक्रीवादळ” बनले आहे.

गुजरातमध्ये 13 जणांचा मृत्यू

राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, 16 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 40 हजारांहून अधिक झाडे आणि 70 हजारांहून अधिक विजेचे खांब उखडले गेले आहेत. तर 5951 गावांत वीज गुल आहे. चक्रीवादळामुळे अधिकृत मृत्यूचा आकडा 13 आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी या वादळाने मोठे नुकसान केले आहे. यात भावनगर, राजकोट, पाटण, अमरेली आणि वलसाडसह गुजरातच्या विविध भागांत कमीतकमी 13 जणांचा बळी गेला. गुजरातमधील वेरावल बंदराजवळ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मासेमारी बोटीतून तटरक्षक दलाने मंगळवारी आठ मच्छीमारांची सुटका केली.

PM Modi To Visit Gujrat And diu to Review Damage By Cyclone Tauktae

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात