उत्तर प्रदेशातील दोन सिंहिणींची प्रकृती कोरोनामुळे गंभीर, इटावा लायन सफारीतील गौरी आणि जेनीफरने सोडले खाणे


उत्तर प्रदेशातील इटावा येथील लायन सफारीतील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून त्यांनी खाणे-पिणे सोडले आहे. Two lions from Uttar Pradesh are in critical condition due to corona, Gauri and Jennifer from Etawah Lion safari eat


विशेष प्रतिनिधी

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा येथील लायन सफारीतील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून त्यांनी खाणे-पिणे सोडले आहे.

गौरी आणि जेनीफर या दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले होते. कोरोना झाल्यावर दोघींनी खाणे-पिणे सोडले आहे. त्यांना सलाईनद्वारे अन्न दिले जात आहे. सूप आणि ग्लुकोज सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.

लायन सफारीचे संचालक कृष्णकुमार सिंह यांनी सांगितले की, गुजरात, हैद्राबाद, डेहराडूनसह उत्तर प्रदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने या सिंहिणींवर उपचार सुरू आहे. ऑनलाईन आणि व्हिडीओ कॉलींगद्वारे त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. काही खातच नसल्याने त्यांची प्रकृती ढासळत आहे.



गौरी आणि जेनीफर यांनी ३० एप्रिलपासून खाणे सोडले होते. त्यामुळे प्रशासनाने येथील १८ सिंह-सिंहिणींची कोरोना चाचणी केली. यामध्ये गौरी आणि जेनीफर यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. बाकी सर्व प्राण्यांची चाचणी निगेटिव्ह आली. याठिकाणी सिंहांसह हरणे, अस्वल, बिबटे हे प्राणीही आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही.

यापूर्वी हैद्राबाद येथील प्राणीसंग्रहालयातील सिंहांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची प्रकृतीही बिघडली नव्हती.

Two lions from Uttar Pradesh are in critical condition due to corona, Gauri and Jennifer from Etawah Lion safari eat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात