कोरोनामुळे आर्थिक तंगी, देशातील साडेतीन कोटी कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले पैसे

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. काम मिळत नसल्याने तसेच वेतन कमी झाल्याने लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशातील साडेतीन कोटी म्हणजे जवळपास निम्या कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीमधून (प्रॉव्हिडंड फंड- पीएफ) पैसे काढले आहे. Economic hardship due to corona, money withdrawn from PF by three and a half crore employees in the country


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. काम मिळत नसल्याने तसेच वेतन कमी झाल्याने लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशातील साडेतीन कोटी म्हणजे जवळपास निम्या कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीमधून (प्रॉव्हिडंड फंड- पीएफ) पैसे काढले आहे.

कोरोनाचा परिणम अर्थव्यवस्थेसोबतच लोकांच्या उत्पन्नावर झाला आहे. य् मार्च महिन्याच्या अखेरपासून देशात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती. त्यानंत कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. याचाच परिणाम कामगारांवर झाला. अनेकांना गमवाव्या लागल्या. काहींच्या वेतनात कपातही झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ३.५ कोटी लोकांनी आपल्या पीएफ खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढल्याचं समोर आले आहे.


indian Railway : स्वस्त आणि मस्त – पहिला वातानुकूलित थ्री टियर इकॉनॉमी क्लास डबा प्रवाशांच्या सेवेत ; पियूष गोयल यांची माहिती


इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार १ एप्रिलनंतर ३.५ कोटी लोकांनी १.२५ लाख कोटी रुपये काढले आहेत. जे २०१९-२०१० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. ईपीएफने ८१,२०० कोटी रूपयांचं सेटलमेंट केलं होतं. रिपोर्टनुसार १ एप्रिल २०२० ते १२ मे २०२१ या कालावधीत ३.५ कोटी श्रमिकांपैकी ७२ लाख श्रमिकांनी १८,५०० कोटी रूपयांच्या नॉन रिफंडेबल कोविड १९ फंडचा फायदा घेतला. सध्या देशात ६ कोटी ईपीएफओचे ग्राहक आहेत.

मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारनं ईपीएफओ ग्राहकांना ७५ टक्के पीएफ बॅलन्स किंवा तीन महिन्यांचं वेतन (जे कमी असेल ते) काढण्याची परवानगी दिली होती. अहवालानुसार, पीएफमधील रक्कम काढण्यात १० टक्क्यांची तेजी दिसून आली. रिटारमेंट, नोकरीतील बदल आणि आता कोरोनाची महामारी ही कारण यात दिसून आली.

Economic hardship due to corona, money withdrawn from PF by three and a half crore employees in the country

महत्वाच्या बातम्या