Fight against corona : जूनअखेरीपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १० कोटींपेक्षा लसी केंद्राकडून मोफत उपलब्ध होणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीच्या आकडेवारीबाबत वेगवेगळे गैरसमज पसरविणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर आणि मेन स्ट्रीम मीडियावर येत असताना केंद्र सरकारने लसीच्या आकडेवारीबाबत स्पष्ट खुलासा केला आहे.Fight against corona total of 5,86,29,000 doses will be provided free of cost by Govt of India to States from 1st May 2021 to 15th June 2021

१ मे २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंतच्या दोन महिन्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचे १० कोटी डोस केंद्र सरकारकडून राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देण्यात येणार आहेत. त्याचा महिनावार तपशील देखील केंद्र सरकारने जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक लसींचे १ मे २०२१ ते १५ जून २०२१ पर्यंत ५ कोटी ८६ लाख २९ हजार डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देण्यात येणार आहेत. यापैकी काही डोस आधी राज्यांना पोहोचवून झाले आहेत.याखेरीज ४ कोटी ८७ लाख ५५ हजार डोस राज्यांना जून २०२१ अखेरपर्यंत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. याचा अर्थ १० कोटी ७३ लाख ८४ हजार डोस केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील. यासंबंधीचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिले आहे.

Fight against corona total of 5,86,29,000 doses will be provided free of cost by Govt of India to States from 1st May 2021 to 15th June 2021