भंडाऱ्यात शासन माझ्या दारी कार्यक्रमात बऱ्याच दिवसांनी शिंदे – फडणवीस – दादा एकत्र; अजितदादांच्या भाषणावेळी गोंधळ!!


विशेष प्रतिनिधी

भंडारा : भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आज बऱ्याच दिवसांनी एकत्र व्यासपीठावर दिसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात लाभार्थ्यांना वेगवेगळ्या लाभाचे वाटप केले. Confusion during Ajit patil speech

मात्र, या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या भाषणाच्या वेळी काही युवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी अनेक नेत्यांना गावबंदी केली अजित पवारांना मध्यंतरी डेंग्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शासन माझ्या दारी हे कार्यक्रम जवळपास स्थगित झाले होते. एक – दोन कार्यक्रमांमध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित राहिले होते. दरम्यानच्या काळात दिवाळी झाली तसेच ओबीसी एल्गार परिषद जालन्यात पार पडली. त्यावेळी नेत्यांना असलेली गावबंदी उठविण्याचा एल्गार छगन भुजबळ यांनी केला.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजारपणाबाबत दिली महत्त्वाची अपडेट,म्हणाले…


या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात आज शासन माझ्या दारी कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते व्यासपीठावर दिसले. यापैकी अजित पवारांच्या भाषणाच्या वेळी काही तरुणांनी गोंधळ घातला, पण त्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेऊन कार्यक्रम सुरळीत होईल, याची व्यवस्था केली.

डेंग्यू आजारातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी आज जाहीर कार्यक्रमात भाषण केले. अजित पवार या कार्यक्रमात काय बोलणार??, याकडे अनेकांचे लक्ष होते. त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजनाबाबत माहिती दिली. पण अजित पवारांचे भाषण सुरू असताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी केली. या तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या तरुणांना तातडीने ताब्यात घेतले. काही काळासाठी गर्दीमध्ये तणाव निर्माण झाला.

अजित पवार म्हणाले :

जनतेच्या घरापर्यंत, दारापर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठीच महायुती सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु केला. काही दिव्यांग होते, काही महिला बचत गट उत्तम पद्धतीने चालवतात, आपण काहींना ट्रॅक्टर दिलेलं आहे. अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. सरकार काम करत असताना तो कार्यक्रम लोकाभिमुख झाला पाहिजे. त्या कामातून प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की, हे सरकार माझा विचार करते. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे.

अनेक महत्त्वाचे निर्णय या सव्वा वर्षाच्या काळात घेतले आहेत, त्यातून माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना सुरु केली. शेतकऱ्यासाठी कोट्यवधी रुपये आपण खर्च करतो. शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा काढता येतो. याचा लाभ राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. तो झाला देखील आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आतापर्यंत 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दर आठवड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेत असतात. या बैठकीत आम्ही सर्वजण असतो. वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री या बैठकीत असतात. त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतात ते सांगण्याचा प्रयत्न ते करतात. आपण 1 हजार 954 कोटी रुपयांचे वाटप महाष्ट्रातील विविध भागात करतोय. त्यातील 965 कोटी रुपयांची मदत याआधीच शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. उर्वरित रकमेचे देखील वाटप सुरू आहे.

Confusion during Ajit patil speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात