विशेष प्रतिनिधी
मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ते त्र्यंबकेश्वरची आश्रमशाळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य माणसासाठी उघडला वर्षा बंगला!!, असे 2024 च्या गणेशोत्सवात घडले. Chief Minister opened Varsha Bungalow for common people during Ganeshotsav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी, विविध देशांच्या राजदूतांनी तिथे जाऊन दर्शन घेतलेच, पण सफाई कामगार, महापालिकेचे कर्मचारी, अन्य सामान्य लोकांना देखील मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवासाठी वर्षावर बोलाविले. वर्षा बंगला सामान्य माणसासाठी खुला केला. सरकारी सुरक्षा नियम पाळून, नोंदणी करून कोणत्याही नागरिकाला वर्षा बंगल्यावर येऊन गणेश दर्शन घेण्याची मूभा दिली.
DCGI : चष्म्याशिवाय वाचण्यास मदत करणाऱ्या आयड्रॉपवर बंदी; प्रिस्क्रिप्शनसह विक्रीस होती परवानगी; कंपनीने चुकीचा प्रचार केला
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. क्लॉस श्वाब व त्यांच्या पत्नी श्रीमती हिल्डे श्र्वाब यांनी दर्शन घेतले. यावेळी श्र्वाब दाम्पत्याच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्र्वाब दाम्पत्याचा पारंपरिक रितीने सत्कार केला.
वर्षा येथील श्री गणेशाची त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समवेत या चिमुकल्यांनी श्री गणेशाची आरती केली. यातील काही विद्यार्थी शेतकरी वेशभूषा करून आले होते. या प्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, माजी खासदार हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App