जातीच्या मुद्द्यावर आरक्षण मिळणार नाही, गेंड्याच्या कातडीवर विश्वास ठेवू नका; राज ठाकरेंचे “सर्वपक्षीय” टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी

जालना : जातीच्या मुद्द्यावर आरक्षण मिळणार नाही हे मी मराठा मोर्चे निघाले तेव्हाच सांगितले होते. आजही तुम्ही गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांवर विश्वास ठेवून स्वतःचा जीव गमवू नका, अशी स्पष्टोक्ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांना भेटून केली. Caste based reservation impossible, asserts raj thackeray

राज ठाकरे यांनी आज जालन्यात मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या ठिकाणी येऊन भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सरकारवर घणाघाती टीका केली. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी तुमचा जीव गमावू नका असेही राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितले. तसेच मराठा समाजालाही त्यांनी हाच सल्ला दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?

सगळ्या आंदोलकांशी मी आत्ता बोलत होतो. ज्या ज्या वेळी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहचल्या. मोर्चे निघत होते तेव्हाही म्हटले होते की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मी आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो. जातीच्या आरक्षणाचे आमीष दाखवून हे आलटून पालटून सत्तेवर येतील. सत्तेवर आले की तुम्हाला तुडवणार, गोळ्या झाडणार. विरोधात गेले की तुमच्यावरचे प्रेम उफाळणार असेच आहे यांचे. लाठीमार करणाऱ्या पोलिसांना दोष देऊ नका, आदेश कुणी दिला त्यांना दोष द्या, असे राज ठाकरे म्हणाले.

गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी तुम्ही जीव गमावू नका

छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभा करायचा आहे हे सांगून मते मागितली. समुद्रात जाऊन फुले टाकली. २००७ किंवा २००८ ला हा विषय आला होता. तेव्हापासून मी सांगतोय छत्रपती शिवरायांचा इतका मोठा पुतळा समुद्रात शकत नाही. आपले गड आणि किल्ले सुधारले पाहिजेत हे मी सांगितले होते, तेच खरे त्यांचे स्मारक ठरेल हे पण सांगितले होते. मात्र सतत हे आरक्षणाचे आणि पुतळ्यांचे राजकारण करायचे, मतं पदरात पाडून घ्यायची आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचं ही यांची भूमिका आहे. मी आज तुमच्यासमोर भाषण करायला आलो नाही. विनंती करायला आलो आहे. ज्या लोकांनी तुम्हाला लाठ्या मारल्या त्या सर्वांना मराठवाड्यात पाऊल ठेवू देऊ नका, जोपर्यंत हे माफी मागत नाहीत. या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका. त्यांना काही फरक पडत नाही. पण आपल्यासाठी जीव महत्त्वाचा आहे. निवडणुका येतील तेव्हा अशी काही आश्वासनं दिली जातील मात्र तेव्हा हे काठीचे वळ विसरू नका, असंही राज ठाकरे म्हणाले.

मी राजकारण करायला आलेलो नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले घडल्या प्रकाराचं कुणी राजकारण करु नये. अरे वा! तुम्ही विरोधी पक्षात असतात तर तुम्ही काय केलं असतंत? मी आज राजकारण करायला या ठिकाणी आलेलो नाही. पण जी दृश्यं मी पाहिली, ज्या प्रकारे माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या ते बघवलं नाही म्हणून मी जालन्यात आलो. मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून काय मार्ग काढता येतो ते पाहतो. मी खोटी आश्वासनं देत नाही, मला खोटं बोलायला, आमिषं द्यायला आवडत नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

Caste based reservation impossible, asserts raj thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात