विशेष प्रतिनिधी
पुणे : आकाशवाणी पुणे आणि पुणेकरांचं एक वेगळंच नातं! एक अख्खी पिढी आकाशवाणीने श्रवण संस्कार करत घडवली. अनेकांची सकाळ ही प्रादेशिक बातम्या पासून सुरू होते, त्यामुळे माहितीचे आणि मनोरंजनाचे कितीही साधन आली तरी आकाशवाणी तिचं स्थान आणि तिचं अस्तित्व, आणि विश्वासार्हता टिकून आहे.Aakashvani Pune on FM.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांची एक मागणी होती. मध्यम लहरी वरून आकाशवाणीचे सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये थोडीशी खरखर असायची त्यामुळे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजेच एफएम वर आकाशवाणी चे कार्यक्रम ऐकता यावेत ही दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार असून, पुणेकरांना आधुनिक स्वरूपाच्या एफएम रेनबो या नव्या केंद्राची भेट मिळण्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरात कार्यक्रम ऐकू न येणे खरखर अशा तक्रारी आता लवकरच इतिहास जमा होणार आहेत.
आकाशवाणीचे पूर्ण केंद्र एफ एम वर स्थलांतरित करण्याच्या मागणीला प्रसार भारतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे पुणे केंद्र एफ एम वर येण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल पुढे पडलं आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारनं प्रसार भारतीला 2500 कोटी रुपयांचा निधी दिला. याच निधीमधून पुण्याला लवकरच हे ट्रान्समीटर उपलब्ध होणार असल्यास बोललं जातंय. आणि यामुळे श्रोत्यांना एफ एम वरून पुणे केंद्राचा प्रसारण ऐकण्याचा आनंद घेता येई
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App