Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!


आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जालनामधील अंबड येथे मराठा समाजाच्या  आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याशिवाय  काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.  आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत पोलीसही मोठ्यासंख्येने जखमी झालेले आहेत. त्यात आता  या घटनेला राजकीय वळण दिलं  जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. that means Sharad Pawar does not support Maratha reservation BJP criticized
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात,  ”शरद पवारांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल. मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. या काळात ते सत्तेवरही होते. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी त्यांनी काय केले? आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवारांनी काय प्रयत्न केले?”
 याशिवाय, ” देवेंद्र फडणवीसांनी सारथी सुरु केली, ज्यातून १०० पेक्षा जास्त मराठा तरुण झाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरु केलं, ज्यामुळे मराठा तरुण छोटे-मोठे व्यवसाय करु लागले.  देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून आरक्षण सुप्रिम कोर्टापर्यंत टिकवले, पण शरद पवार शिल्पकार असलेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेले. यावर पवारांना कधी कळवळा आला?” असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.
याचबरोबर ”शरद पवार त्यांच्याच आत्मचरित्रात म्हणतात आरक्षण देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो. जी समाजाची गरज आहे, त्यात काय आलं वादग्रस्त? म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, हीच त्यांची मूळ भूमिका दिसते.” असं सांगत केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
तर, मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले आणि आज समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवायचा प्रयत्न करत आहेत, पण तो आम्ही बिघडू देणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुलढाण्यातल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाद्वारे दिला आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात