प्रतिनिधी
जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला स्वातंत्र्यपूर्वकाळात हैदराबाद संस्थान असताना जे मराठा कुणबी आरक्षण होते, ते आम्हाला हवे आहे. सुप्रीम कोर्टात गायकवाड रिपोर्टच्या संदर्भात अडकलेले आरक्षण नको, असा स्पष्ट खुलासा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. Manoj jarange patil demands Hyderabad state maratha kunabi reservation implementation
राज ठाकरे यांनी जातीच्या निकषावर आरक्षण मिळणार नाही अशी स्पष्टोक्ती केल्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांच्याशी बोलताना तो खुलासा केला. याची माहिती स्वतः जरांगे पाटील यांनीच नंतर पत्रकारांना दिली.
मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक, आज छत्रपती संभाजीनगर, सातारा, नांदेडसह अनेक जिल्ह्यांत बंद
हैदराबाद संस्थान स्वातंत्र्यपूर्वकाळात मराठवाड्यापर्यंत होते. तेथे त्यावेळी मराठा कुणबी समाजाला आरक्षण होते. ते आरक्षणाच मराठवाड्यातील मराठा समाजासाठी पुन्हा लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली.
गायकवाड रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर झाल्यानंतर त्या संदर्भातले आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केले. ते आरक्षणा आम्हाला नको. तशी आमची मागणी नाही, असा स्पष्ट खुलासा आम्ही राज ठाकरेंशी बोलताना केल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटलांच्या या खुलाशानंतर त्यांच्या मूलभूत भूमिकेविषयी सध्या तरी खुलासा झाल्याचे दिसून येत आहे. आता त्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकार कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App