मालेगावमध्ये भाजपचे ओबीसी आरक्षणाच्या बाजूने जोरदार आंदोलन


प्रतिनिधी

मालेगाव : भारतीय जनता पार्टीचे मालेगाव येथे ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन झाले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यात ठाकरे – पवार सरकारने ओबीसी विरोधी पावले उचलल्या बद्दल जोरदार निषेध करण्यात आला. यात काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले. BJP’s strong agitation in favor of OBC reservation in Malegaon

  •  ओबीसींचे 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण हायकोर्टात टिकले ते भाजपा सरकारच्याच कार्यकाळात. प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रश्न गेला, तेव्हा आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी सुद्धा मिळाली, भाजपाच्याच कार्यकाळात
  •  50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण वाचविण्यासाठी 31 जुलै 2019 ला अध्यादेश काढला तो भाजपाच्याच कार्यकाळात. एका रात्रीत अध्यादेश काढून सुप्रीम कोर्टात दाखविला आणि तो न्यायालयाने मान्य केला, भाजपाच्याच कार्यकाळात
  •  महाविकास आघाडीने मात्र हा अध्यादेश लॅप्स (व्यपगत) होऊ दिला आणि त्याला कायद्यात परावर्तित केले नाही.
  •  भाजपा सत्तेत असेपर्यंत 50 टक्क्यांच्यावरील ओबीसी आरक्षणाला सुद्धा कुणी धक्का लावू शकले नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण सुद्धा रद्द झाले.
  •  13 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा एम्पिरिकल डेटा मागितला. 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण आणि हा डेटा हे दोन्ही प्रश्न पहिल्यांदा तेव्हा आले. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार होते.
  •  महाविकास आघाडी सरकारने 15 महिने राज्य मागासवर्ग आयोगच तयार केला नाही. 7 वेळा केवळ तारखा मागितल्या आणि आठव्यांदा कोर्टात जाऊन सांगितले की, अनेक जिल्ह्यांत आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाते आहे.
  •  विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी ही वस्तुस्थिती समजून घ्यावी. ओबीसी समाज मुर्ख नाही. त्यामुळे त्यांनी दिशाभूल करणे तत्काळ थांबवावे.

BJP’s strong agitation in favor of OBC reservation in Malegaon

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात