वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अत्यंत टेकसॅव्ही असून त्यांच्या यूट्युब चॅनेलमधून ते महिन्याला चार लाख रुपये कमावत आहेत. या बाबतची माहिती त्यांनी नुकतीच एका भाषणात दिली. BJP Leader Nitin Gadkari Earns 4 lakh Rupees Income from His youtube channel
नितीन गडकरी यांचे यूट्युब वरील एक भाषण गाजत आहे. या भाषणात त्यांनी कोरोनाच्या काळात जीवनात कसे बदल झाले, याबद्दल सांगितले. मी टेकसॅव्ही होण्यासाठी काही पावले उचलली. मी यूट्युब चॅनेलवर सक्रिय झाल्याने आता महिन्याकाठी मला जवळपास 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा खुलासा नितीन गडकरी यांनी केला. याशिवाय, ट्विटरवर माझ्या फॉलोअर्सची संख्याही तब्बल 1 कोटी 20 लाख झाल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या. सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय लागली. मी भगवदगीताही ऐकायला लागलो. आयुष्यात मी प्रथमच गीतेचे दहा अध्याय, त्याचे विवेचन शांतपणे ऐकले. ही माझ्यादृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. – नितीन गडकरी , केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App