पीएम मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कोविड व्यवस्थापनावर व्यक्त केले समाधान, म्हणाले- असेच काम करत राहा!

PM Modi Satisfied On CM Yogi Adityanaths Covid Management In Uttar Pradesh

Covid Management In Uttar Pradesh : जागतिक आरोग्य संघटना आणि नीती आयोगाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या कोविड व्यवस्थापनाचे यापूर्वीच कौतुक केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीसोबत पंतप्रधानांनी संपूर्ण उत्तर प्रदेशातील परिस्थितीची माहिती घेतली. मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनी दिलेल्या अहवालावर समाधानी होत त्यांनी असेच काम सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले. PM Modi Satisfied On CM Yogi Adityanaths Covid Management In Uttar Pradesh


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : जागतिक आरोग्य संघटना आणि नीती आयोगाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या कोविड व्यवस्थापनाचे यापूर्वीच कौतुक केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीसोबत पंतप्रधानांनी संपूर्ण उत्तर प्रदेशातील परिस्थितीची माहिती घेतली. मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनी दिलेल्या अहवालावर समाधानी होत त्यांनी असेच काम सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले.

ज्या ठिकाणी संक्रमण वेगाने पसरला गेला त्या शहरांमध्ये पंतप्रधान मोदींचा संसदीय मतदारसंघ वाराणसीचादेखील गेल्या काही दिवसांत समावेश होता. आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मंगळवारी राज्य मुख्य सचिव आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी वाराणसीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिवांनी पंतप्रधानांना वाराणसीतील कोरोना नियंत्रणाचा सविस्तर अहवाल दिला आणि राज्यात कोविड व्यवस्थापनांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

त्यांनी म्हटले की, आता यूपीचा संसर्ग दर 3.२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तर बरे होण्याचा दर 90 टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यांना माहिती देण्यात आली की, खेड्यांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी सरकार गावोगावी सर्वेक्षण करत आहे. ग्रामस्थांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक गावात विलगीकरण केंद्रे तयार केली गेली आहेत. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सतत जिल्हा आणि खेड्यांचा दौरा करत असतात आणि भौतिक आढावा घेतात. पंतप्रधानांनी या सर्व प्रयत्नांचे कौतुक केले. सुधारण्याच्या स्थितीबद्दल समाधान व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने कार्य करण्याचे प्रोत्साहन दिले.

PM Modi Satisfied On CM Yogi Adityanaths Covid Management In Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात