दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीने भारत – सिंगापूर सहयोगावर दुष्परिणाम होणार नाही ; सिंगापूरच्या उच्चायुक्तांची ग्वाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या एका व्हेरिएंटला सिंगापूर व्हेरिएंट असे संबोधल्यानंतर निर्माण झालेल्या वादात सिंगापूरने समंजस भूमिका घेतली आहे. भारत आणि सिंगापूर यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची यावर सविस्तर चर्चा झाली. Delhi Chief Minister’s remarks will not adversely affect India-Singapore cooperation

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे विधान ही भारतीय सरकारची आणि संपूर्ण भारताची भूमिका नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. यावर सिंगापूर सरकारच्या वतीने सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वाँग यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीमुळे भारत – सिंगापूर यांच्या सहयोगावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.



कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला भौगोलिक अथवा वादग्रस्त ठरेल, असे नाव देण्यात येऊ नये अशी सिंगापूरची भूमिका आहे आणि ती WHO पुढे स्पष्ट करण्यात आली आहे. कोविड विरोधात भारत आणि सिंगापूर एकत्र काम करतील आणि एकमेकांच्या नागरिकांना निरंतर मदत करीत राहतील, असा मला विश्वास वाटतो.

कोणतीही महामारी वंश, जात, लिंग पाहात नाही. देशांच्या सीमांशी तिचा संबंध नसतो. त्यामुळे तिच्याकडे राजकीय चष्म्यातून पाहता येत नाही, याकडे वाँग यांनी लक्ष वेधले.

सिंगापूरमध्ये ऑनलाइन अफवा पसरविणाऱ्यांविरोधात आणि खोटी माहिती देणाऱ्यांविरोधात कठोर कायदा (POFMA) अस्तित्वात आहे. त्याचा वापर आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शेरेबाजीविरोधात करू शकतो. पण भारत सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सिंगापूर सरकारचे समाधान झाले आहे, असेही वाँग यांनी सांगितले.

Delhi Chief Minister’s remarks will not adversely affect India-Singapore cooperation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात