राजधानी दिल्लीला द्या लशीचे तीन कोटी डोस, केजरीवाल यांचे केंद्राला साकडे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिल्लीला पुरेशा लस मात्रांचा पुरवठा करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले आहे. रोज तीन लाख नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता दिल्ली सरकारमध्ये आहे मात्र त्यासाठी किमान तीन कोटी डोस लागतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. Delhi govt. urges for vaccines

दिल्लीत १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील ९२ लाख लोक आहेत. त्यामुळे दिल्लीला किमान मे ते जुलै या काळात दरमहा ६० लाख डोस देण्याचे निर्देश मोदी सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना द्यावेत अशी विनंतीही केजरीवाल यांनी केली आहे.



सध्या राज्य सरकारकडे कोव्हॅक्सिन या लसीचा केवळ एका दिवसाचा आणि कोव्हिशिल्ड लसीचा दोन ते तीन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. दिल्ली सरकारने आतापर्यंत ३८ लाख ९६ हजार ५५१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. पुढील तीन महिन्यांत दिल्लीतील लसीकरण पूर्ण करायचे असेल तर दरमहा किमान ८३ लाख लस मिळाल्या पाहिजेत अशी दिल्ली सरकारची मागणी आहे.

Delhi govt. urges for vaccines

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात