Cyclone Tauktae : पीएम मोदींनी गुजरातसाठी जाहीर केली 1000 कोटी रुपयांची मदत, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची भरपाई

PM Modi Aerial Survey Of Cyclone Tauktae Affected Area In Gujarat And Diu, announces Rs 1000 crore Package And More

Cyclone Tauktae : तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दीव येथील बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले. पीएम मोदी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर आले होते, तेथे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरमधून बाधित भागाचा हवाई दौरा केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी 1000 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. PM Modi Aerial Survey Of Cyclone Tauktae Affected Area In Gujarat And Diu, announces Rs 1000 crore Package And More


वृत्तसंस्था

अहमदाबाद : तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दीव येथील बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले. पीएम मोदी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर आले होते, तेथे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरमधून बाधित भागाचा हवाई दौरा केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी 1000 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले.

पीएम मोदी म्हणाले की, केंद्र सरकार एक मंत्रिमंडळाचा गट पाठवणार आहे, हा गट संपूर्ण राज्यात दौरा करून नुकसानीची माहिती घेईल. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पुनर्उभारणीसाठी केंद्र सरकार मदत करेल. पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचाही आढावा घेतला.

सर्व राज्यांत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख आणि जखमींच्या कुटुंबीयांना 50000 रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाने बाधित झालेल्या सर्व राज्यांना केंद्र सरकार तातडीने मदत देईल. ते म्हणाले की, तौकतेमुळे बाधित झालेल्या सर्व राज्यांनी केंद्राला त्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन पाठवताच त्यांना केंद्रीय मदत निधी दिला जाईल.

पीएम मोदी यांनी ट्वीट करून लिहिले की, ‘चक्रीवादळ तौकतेच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे आकलन करण्यासाठी गुजरात आणि दीवमधील काही भागाचे हवाई सर्वेक्षण केले. चक्रीवादळाने बाधित झालेल्या सर्व राज्यांसोबत मिळून केंद्र सरकार लक्षपूर्वक काम करत आहे.” तत्पूर्वी रूपाणी यांनी ट्विट केले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनगरला पोहोचले आहेत. ते चक्रीवादळ तौकतेने प्रभावित अमरेली, गिर सोमनाथ आणि भावनगर या जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत.

अहमदाबादेत पंतप्रधानांची आढावा बैठक

चक्रीवादळामुळे सोमवारी गिर सोमनाथ जिल्ह्यातील दीव आणि उना शहर येथे सोमवारी पाणी साचले होते. त्यामुळे मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. बाधित भागाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी अहमदाबाद येथे गुजरातमध्ये चक्रीवादळ तौकतेमुळे झालेल्या नुकसानीचे आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुजरातमध्ये चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, विजेचे खांब व झाडे उखडली गेली आणि बरीच घरे व रस्ते खराब झाले. या काळात झालेल्या घटनांमध्ये जवळजवळ 13 जणांचा मृत्यूही झाला आहे. चक्रीवादळामुळे 200 हून अधिक तालुक्यांमध्ये पाऊस पडला. खबरदारी म्हणून राज्य सरकारने दोन लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते.

वादळामुळे 70 हजारांहून अधिक विजेचे खांब उखडले

कमकुवत होण्याआधी सोमवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये तौकते चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडला आणि या कालावधीत वेगवान वादळाने कित्येक खांब आणि झाडे उन्मळून पडली. घरांचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने सांगितले की, तौकते चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर “अत्यंत गंभीर चक्रीवादळ” होते. कमकुवत होत हळूहळू “तीव्र चक्रीवादळ वादळा”मध्ये बदलले आणि आता ते “चक्रीवादळ” बनले आहे. राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, 16 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 40 हजारांहून अधिक झाडे आणि 70 हजारांहून अधिक विजेचे खांब उखडले गेले आहेत. तर 5951 गावांत वीज गुल आहे. चक्रीवादळामुळे अधिकृत मृत्यूचा आकडा 13 आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी या वादळाने मोठे नुकसान केले आहे. यात भावनगर, राजकोट, पाटण, अमरेली आणि वलसाडसह गुजरातच्या विविध भागांत कमीतकमी 13 जणांचा बळी गेला. गुजरातमधील वेरावल बंदराजवळ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मासेमारी बोटीतून तटरक्षक दलाने मंगळवारी आठ मच्छीमारांची सुटका केली.

PM Modi Aerial Survey Of Cyclone Tauktae Affected Area In Gujarat And Diu, announces Rs 1000 crore Package And More

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात