नांदेडचा टँकर विशाखापट्टनमला पळवला ; अशोक चव्हाणांचा थेट गडकरींना फोन ; गडकरींची तत्काळ मदत


विशेष प्रतिनिधी

नागपूर :  महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने काहीजणांकडून परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होत आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार होतोय. असाच एक प्रकार काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत घडला आणि त्यांनी थेट नितीन गडकरी यांना फोन करत मदत मागीतली .गडकरी यांनी भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी हा प्रकार सांगितला. Ashok Chavan calls Union Minister Nitin Gadkari



राज्यात ऑक्सजिनचा तुटवडा भासत असल्यामुळे बाहेर राज्यातून ऑक्सिजन आणला जात आहे. अशावेळी नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्याबाबत अशोक चव्हाण यांनी गडकरींना फोन केला. त्या ट्रान्सपोर्टरने चव्हाण यांच्याकडे १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर गडकरी यांनी रात्री १२-१ वाजता त्या ट्रान्सपोर्टला फोन केला आणि दवाब टाकत त्याला सांगितलं ही हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु.त्यानंतर ते टँकर जप्त करण्यात आले .

शोषण आणि संघर्ष दोन्ही टाळायचे आहे

रुग्णवाहिका, टँकर्स, हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकलवाले यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन कुठेही गरीब माणसाची पिळवणूक करता कामा नये. पण आता ऑडिटिंग करणं, रेड मारणं, चौकश्या करणं, डॉक्टरांशी भांडण करणं याची वेळ नाही. म्हणजेच आपल्याला लोकांचं शोषण होता कामा नये याचीही काळजी घ्यायची आहे आणि संघर्षही टाळायचा आहे. अशाप्रकरचा संघर्ष करुन आहे ती व्यवस्थाही बंद करणं हे समाजासाठी उपयुक्त ठरणार नाही, असं गडकरी यांनी स्पष्ट केले आहे .

Ashok Chavan calls Union Minister Nitin Gadkari

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात