ज्येष्ठ नेते संभाजीराव काकडे यांचे निधन, शरद पवार यांचे होते कट्टर विरोधक, शेकडो कार्यकर्ते घडविले


जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. राज्यात आणि पुणे जिल्ह्यात शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शेकडो कार्यकर्ते घडविले होते.


प्रतिनिधी

पुणे : जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. राज्यात आणि पुणे जिल्ह्यात शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शेकडो कार्यकर्ते घडविले होते. The demise of senior leader Sambhajirao Kakade, Sharad Pawar was a staunch opponent, formed hundreds of activists

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते दोन वेळा निवडून गेले होते. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातही त्यांचे मोठे योगदान होते. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीचे ते खंदे पाठिराखे होते.

बारामती तालुक्यातील मातब्बर अशा काकडे घराण्यात त्यांचा जन्म झाला. संभाजीराव यांनी राज्यस्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत अनेक कार्यकर्ते घडविले . कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रसंगी पदरमोडही केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते, बबनराव ढाकणे, कै. किसनराव बाणखेले, संभाजीराव पवार यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले.

संभाजीराव काकडे 1971 मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळचे कॉंग्रेसचे मातब्बर रंगराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. ही निवडणूक काकडे यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. यशवंतराव चव्हाण यांनी रंगराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न करूनही काकडे त्यावेळी निवडून आले होते.

1978 तसेच 1982 साली ते बारामती लोकसभा मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याकाळी संभाजीराव काकडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जात असत .

काकडे हे सुरवातीला सिंडीकेट कॉंग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती.

The demise of senior leader Sambhajirao Kakade, Sharad Pawar was a staunch opponent, formed hundreds of activists

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात