टाटा समूह विमानातून आणणार क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅँकर


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे टाटा समूह विमानाद्वारे परदेशातून 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात आणणार आहे. सुमारे 400 ऑक्सिजन उत्पादन युनिट्सची स्थापना करणार आहे. या ऑक्सिजनचा वापर लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये केला जाऊ शकतो.Cryogenic oxygen tanker to be brought from aircraft by Tata Group


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्यां लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑ क्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे टाटा समूह विमानाद्वारे परदेशातून 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात आणणार आहे. सुमारे 400 ऑक्सिजन उत्पादन युनिट्सची स्थापना करणार आहे.

या ऑक्सिजनचा वापर लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये केला जाऊ शकतो.ग्रुपच्या विविध कंपन्यांनी एकत्रित येत कोव्हिड रुग्णांसाठी सुमारे 5,000 बेड्सची व्यवस्था केली आहे. टाटा समूह त्यांच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देत आहे. यामध्ये हॉटेल व्यवसायाशी संबधित कर्मचाऱ्याचा समावेश मोठा आहे.



रुग्णांची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.टाटा सन्सचे अध्यक्ष (पायाभूत सुविधा, संरक्षण, एरोस्पेस आणि ग्लोबल कंपनी अफेअर्स विभाग) बनमाली अग्रवाल म्हणाले की, आम्ही दररोज सुमारे 900 टन ऑक्सिजन उपलब्ध करत आहोत.

टाटा स्टील स्वत: हे काम करत आहे. टाटा स्टीलमधील आमच्या लोकांनी वाहतूक ही समस्या असल्याचे ओळखले आहे. क्रायोजेनिक कंटेनरची आवश्यकता आहे. क्रायोजेनिक कंटेनर्स भारतात नाहीत.

त्यामुळे आम्हाला हे इतर देशांकडून माहिती घेऊन, शोधून विमानाद्वारे हे कंटेनर्स देशात आणावे लागणार आहेत.आम्ही जवळपास 60 कंटेनर्स भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी सुमारे 14 कंटेनर्स यापूर्वीच भारतात दाखल झाले आहेत.

अजून बरेच कंटेनर्स येणं बाकी आहे. कंटेनर्स आणण्यासाठी हवाई दलाची विमानं उपलब्ध करून दिल्याबद्दल अग्रवाल यांनी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की कोविड -19 साथीच्या रोगाची दुसरी लाट अत्यंत गंभीर असून ती अचानक आल्यामुळे चिंता वाढल्या आहेत.

Cryogenic oxygen tanker to be brought from aircraft by Tata Group

महत्त्वाची बातमी

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात