मुंबई एक जूनपर्यंत कोरोनाला रोखणार, संसर्गाचा वेग घटणार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा दावा

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असला तरी १ जूनपर्यंत मुंबईत कोरोनाच्या संसर्गात घट होणार आहे. व्हायरसचा नवा व्हेरिएंटर आला नाही तर मुंबई कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरणार असल्याचा दावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या अभ्यासकांनी केला आहे. लसीकरण कार्यक्रम व्यवस्थितपणे राबविल्यास कोरोनाचा वेग घटून जुलै महिन्यात शाळा सुरू करणेही शक्य होईल, असेही अभ्यासात म्हटले आहे.Mumbai to stop corona by June 1, slow down infection, claims Tata Institute of Fundamental Research


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असला तरी १ जूनपर्यंत मुंबईत कोरोनाच्या संसर्गात घट होणार आहे. व्हायरसचा नवा व्हेरिएंटर आला नाही तर मुंबई कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरणार असल्याचा दावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या अभ्यासकांनी केला आहे.

लसीकरण कार्यक्रम व्यवस्थितपणे राबविल्यास कोरोनाचा वेग घटून जुलै महिन्यात शाळा सुरू करणेही शक्य होईल, असेही अभ्यासात म्हटले आहे.
लोकलमधील गर्दीमुळेच कोरोना वाढल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू होण्याची भीती आहे. मात्र, मे महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास सुरूवात होईल. हा आकडा १ जूनपर्यंत कमी होत जाईल. लसीकरण कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवून महिन्याभरात १५ ते २० लाख लोकांचे लसीकरण झाल्यास मृत्यूची संख्या कमी होईल.

मुंबईमध्ये दुसºया लाटेमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत अडीच पट वाढ झाली आहे. याची कारणे शोधण्यासाठी टाटा इस्टिट्यूटतर्फे मॅथेमॅटीकल रिसर्च रिपोर्ट तयार करण्यात आला.

या टीमचे प्रमुख डॉ. संदीप जुनेजा म्हणाले, कोरोनाच्या जुन्या स्ट्रेनपेक्षा नवा स्ट्रेन अडीच पट अधिक संक्रमक आहे. त्यामुळेच मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढला. त्याबरोबरच मृतांची संख्या वाढली.

याचे आणखी एक कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने झाला. फेब्रुवारी महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य मोठ्या शहरांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सक्रीय होता.

मात्र, याच वेळी शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल सेवाही पूर्ण क्षमतेने चालू होती. त्याचबरोबर लांब पल्याच्या गाड्या, रस्त्यावरील वाहतूकही वाढली. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला.

त्यामुळेच मुंबईमध्ये एक मे रोजी सर्वाधिक ९० जणांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात मुंबईत २ लाख ३० हजार नागरिक कोरानाबाधित झाले. त्यापैकी १४७९ जणांचा मृत्यू झाला. २४ जूननंतरची ही सर्वाधिक मोठी वाढ होती.

फेब्रुवारी महिन्यात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कोरोनाच्या निर्बंधांमध्ये सुट देण्यात आली. त्यामुळेच मार्च महिन्यातील परिस्थिती गंभीर बनली.
राज्यातील अनेक शहरांमध्ये याच काळात कोरोनाबाधितांची संख्या वााढली.

गर्दी हेच त्याचे मुख्य कारण आहे. सार्वजनिक ठिकाणांवर वाढलेली गर्दी, लोकांना प्रवास करण्याची दिलेली मुभा यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

Mumbai to stop corona by June 1, slow down infection, claims Tata Institute of Fundamental Research

महत्त्वाच्या बातम्या