लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा वैमानिकांचा इशारा


एअर इंडियाने अठरा वर्षांवरील सर्व विमान कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा इशारा वैमानिकांनी दिला आहे. द इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशनच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे. air india Pilots warned to go on strike if vaccination is not given priority


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एअर इंडियाने अठरा वर्षांवरील सर्व विमान कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा इशारा वैमानिकांनी दिला आहे. द इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशनच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे.

वैमानिकांच्या संघटनेने याबाबत नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री हरदीपसिंग पूरी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये कोरोनापूर्व काळात असलेले वेतनही पूर्ववत करावे, असे म्हटले आहे. आजपर्यंतची सर्वात दीर्घकालीन आणि मोठ्या वेतनकपातीची शिक्षा आम्हाला दिली आहे. सध्याच्या कठीण काळात एअर इंडियाच्या व्यवस्थापनाकडून वैमानिकांचे शोषण केले जात असल्याचा आरोपही वैमानिकांनी केला आहे.



कोरोनाच्या बारा महिन्यांच्या काळात आपल्या कार्यालयातून आमच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली गेली नाही यामुळे आम्ही नाउमेद झालो आहोत.

गेल्या वर्षी निर्गुंतवणुकीचे वारे वाहत असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५५ टक्के कपात करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या निमित्ताने ही वेतनकपात थोपविण्यात आली. गेल्या डिसेंबरमध्ये यातील पाच टक्के वेतनकपात मागे घेण्यात आली.

मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना अर्ध्या पगारातच काम करावे लागत आहे. ही सगळी वेतनकपात सुरू असतानाही एअर इंडियाच्या वैमानिकांनी भव्य दिव्य कामगिरी केली आहे. याच काळात आव्हानात्मक अशी वंदे भारत मोहीम यशस्वी केली. यामध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्याचे काम त्यांनी केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही एअर इंडियाचे कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांत प्रवासी आणि कर्मचारी कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वैमानिक आणि त्यांची कुटुंबेही बाधित होत आहेत. त्यामुले त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. आमच्या आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यासाठी रुग्णालयांत बेड उपलब्ध करणे आणि त्यांना ऑक्सिजन मिळवून देणे आव्हानात्मक बनले आहे. मात्र, सध्या परिस्थिती भीषण बनली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे वैमानिकांच्या संघटनेने म्हटले आहे.

air india Pilots warned to go on strike if vaccination is not given priority

विशेष बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात