ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी; शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा

प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी 19 सप्टेंबरला या शेकडो गावांचे निकाल लागत आहेत. या मतमोजणीतून आतापर्यंत हाती लागलेल्या निकालानुसार सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे, तर सर्वात कमी ग्रामपंचायती ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या आहेत. BJP in Gram Panchayat Elections win

भाजपने 37 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी 19 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत दुस-या स्थानावर आहे. शिंदे गटाने 5 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे, तर सर्वात कमी म्हणजे 4 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाचा विजय झाला आहे. तर इतर पक्ष आणि आघाड्यांचा 10 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला आहे.

नंदूरबार आतापर्यंतचे जाहीर निकाल

नंदुरबार ग्रामपंचायतींची संख्या-19

  • भाजप- 13
  • शिंदे गट- 04
  • काॅंग्रेस- 02
  • राष्ट्रवादी-00
  • अपक्ष-00
  • ठाकरे गट- 00

दिंडोरी तालुक्यातील निकाल

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे पॅनल विजयी, सरपंचपदी सुभाष नेहरे विजयी, मोहाडी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे पॅनल, सरपंचपदी आशा लहानगे विजयी, दिडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन तर ठाकरे गट एका जागेवर विजयी.

BJP in Gram Panchayat Elections win

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात