संभाजी नगरात शिंदेंनी उतरवले भुमरे; पण नाशिकचे उमेदवार अजून लटकवले!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती संभाजीनगर अर्थात अजूनही औरंगाबाद नाव असलेल्या लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हो – नाही करताना अखेर राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनाच लोकसभेच्या मैदानात उतरवले, पण नाशिकचे उमेदवार मात्र अजून लटकवले!! Bhumres were landed by Shinds in Sambhaji Nagar

एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर मधून राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. आता त्यांची लढत विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी होणार आहे. चंद्रकांत खैरे यांनीही आपली शेवटची निवडणूक असल्याचे आधीच जाहीर करून ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही आणि शिवसेना अखंड असूनही चंद्रकांत खैरे यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीतून निवृत्ती घ्यायची, ती जिंकूनच या जिद्दीने चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना टक्कर देण्याचे आव्हान संदीपान भुमरे यांच्यासमोर आहे. औरंगाबाद मतदार संघातून भाजपचे अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उमेदवारीची चर्चा होती. परंतु महायुतीने संदिपान भुमरे यांच्यावरच डाव लावला.

नाशिक मध्ये मात्र छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतरही महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याची हूल दिली आहे. प्रत्यक्षात तेच उमेदवार असू शकतात किंवा शेफाली भुजबळ उमेदवार असू शकतात, अशी भुजबळ कॅम्प मधून चर्चा सुरू ठेवली आहे, तर शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून अजय बोरस्ते यांचे नाव हळूहळू समोर येताना दिसत आहे. पण अंतर्गत संघर्षात नाशिकची उमेदवारी लटकलेलीच राहिली आहे.

Bhumres were landed by Shinds in Sambhaji Nagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात