विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामतीतल्या काका विरुद्ध पुतण्या अर्थात नणंद भावजय या लढ्यात पवार काका पुतणे अक्षरशः बारामती मतदारसंघ पायाला भिंगरी लावून पिंजून काढत आहेत पवारांच्या बाजूने येणाऱ्या प्रत्येक आरोपाला अजित पवार तितक्याच प्रखरतेने प्रत्यारोप करून परतवत आहेत. Sharad pawar will weep, but you don’t follow his tears, ajit pawar tells baramati voters
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला खरं म्हणजे आधीपासूनच सुरुवात झाली आहे. पण एक परंपरा म्हणून कान्हेरीतल्या मारुतीला नारळ फोडून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी आपल्या प्रचाराची एकापाठोपाठ एक सुरुवात केली आहे. अजितदादांनी शरद पवारांच्या सगळ्या निवडणूक क्लुप्त्या ओळखल्याने पवार कसे बारामतीकरांना भावनिक करतील हे सातत्याने सांगितले आहे.
आजच्या सभेत देखील अजितदादा तोच किस्सा पुन्हा रिपीट केला. शरद पवार तुम्हाला सांगतील, ही माझी शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला भावनिक करतील. ते डोळ्यात अश्रूही काढतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका. आपल्या मुलांचा, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेत घडाळ्यासमोरचे बटन दाबा, अशी सूचना अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना केली.
शरद पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात भर पावसात भिजले. छत्री उपलब्ध असूनही त्यांनी छत्री घेतली नाही. त्यामुळे साताऱ्यातली निवडणूक फिरली आणि श्रीनिवास पाटील जिंकले, असे मानले गेले. पवारांनी त्यावेळी पावसाचा भावनात्मक उपयोग करून घेतला. यावेळी ते आपल्या अश्रूंचा भावनात्मक उपयोग करून घेतील, असे भाकीत अजितदादांनी वर्तवून मात्र त्या भावनिकतेला तुम्ही बळी पडू नका असे आवाहन बारामतीकरांना केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App