नाशिक : भोंदू बाबा अशोक खरातच्या भोंदू उद्योगात राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!, अशी अवस्था येऊन ठेपलीय. कारण ज्या पद्धतीने “पवार संस्कारित” रूपाली चाकणकर अशोक खरातच्या प्रकरणात अडकल्या, त्याच्या पलीकडचे प्रकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बाहेर काढले आणि त्यांना आमदार रोहित पवारांनी दुजोरा दिला.
रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातचे पाय धुतले. त्या अशोक खरातच्या शिवालिक ट्रस्टवर विश्वस्त राहिल्या. पण अशोक खरातचे महिलांच्या लैंगिक छळाचे प्रकरण बाहेर आल्याबरोबर रूपाली चाकणकरांचे महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष पद धोक्यात आले. त्यांच्याच पक्षाच्या रूपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अमोल मिटकरी यांनी रूपाली चाकणकर यांच्याविरुद्ध आघाडी उघडली. रूपाली चाकणकरांवर कारवाई करायचे आश्वासन प्रफुल्ल पटेल यांना द्यावे लागले.
– अमोल मिटकरी यांचे ट्वीट
पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांचे बारामती मधले निवासस्थान सहयोग सोसायटीच्या समोर कुठली तरी अघोरी पूजा केल्याचा फोटो आणि त्या दिवसांमध्ये पंचांग अमोल मिटकरी यांनी आपली ट्विटर हँडल वर शेअर करून अशोक खरातच्या प्रकरणाला वेगळीच राजकीय फोडणी दिली. अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा विमान अपघात, त्या अपघातात सापडलेले VSR कंपनीचे विमान या सगळ्याचे कनेक्शन भोंदू बाबा अशोक खरातशी जोडले. अशोक खरातने कुणाची तरी सुपारी घेऊन सहयोग सोसायटी समोर कुठलीतरी आघोरी पूजा केली. जादूटोणा केला. त्यानंतर विमान अपघात झाला, अशोक खरातला कोणी सुपारी दिली??, अशा आशयाची जोडणी अमोल मिटकरींनी करून राष्ट्रवादीत संशयाची पेरणी केली.
– रोहित पवारांचा दुजोरा
अमोल मिटकरी यांचे संबंधित ट्विट स्वतःच्या ट्विटर हँडल वर शेअर करून रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या विषयाला दुसरी राजकीय फोडणी दिली. अमोल मिटकरी आणि रोहित पवार या दोघांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांभोवती संशयाचा घेरा आवळला. अजित पवारांचे मुंबईतले निवासस्थान देवगिरी बंगल्यावर 27 जानेवारीला कोण आले होते?, याचा तपास करावा. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी सावध राहावे, असे रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले.
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा… https://t.co/XiLhSHAiNx — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 20, 2026
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा… https://t.co/XiLhSHAiNx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 20, 2026
– पवारांचे पुरोगामी संस्कार ठरले पोकळ
पण यातून एकच बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे शरद पवारांनी आपल्या नेत्यांवर “पुरोगामी संस्कार” केले, पण ते सगळे नेते भोंदू बाबाच्या नादी लागले. पवारांचे “पुरोगामी संस्कार” पोकळ ठरले. राष्ट्रवादीचेच नेते भोंदूगिरीच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकले.
कैप्टन अशोक खरातचे संबंध VSR पर्यंत असू शकतात तर विचार करा हा धागा कुठपर्यंत जाऊ शकतो ! pic.twitter.com/ufg40saIKG — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 18, 2026
कैप्टन अशोक खरातचे संबंध VSR पर्यंत असू शकतात तर विचार करा हा धागा कुठपर्यंत जाऊ शकतो ! pic.twitter.com/ufg40saIKG
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 18, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App