भगवानगड दसरा मेळावा : खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीला गोपीनाथ गडावरुन केली सुरुवात


सर्व कोरोना नियम पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं आधीच पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते.Bhagwangad Dussehra Melava: MP Pritam Munde’s rally started from Gopinath fort


विशेष प्रतिनिधी

बीड : आज दसरा सण आहे, या सणाचे औचित्य साधुन विविध पक्ष मेळाव्याचे आयोजन करतात.यात सर्वाधिक चर्चा असते ती भगवानगड येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची. सर्व कोरोना नियम पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं आधीच पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते.

भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात केलीय, यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या की दसरा मेळाव्याची परंपरा ही मुंडे साहेबांची परंपरा होती, त्यांनी या मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे.



खासदार प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की , कोरोनामुळे एक वर्ष या मेळाव्याला खंड पडला होता. मात्र आता या एक वर्षाच्या खंडानंतर ही रॅली निघत आहे. यावेळी लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. मात्र हा उत्साह दाखवताना लोकांनी आपापली काळजी घ्यावी. दरम्यान पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या मेळाव्यातून जसा संकेत देतील तसा आमचा संकल्प असेल.

त्यामुळे आता या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय संकेत देणार ? आणि या संकेताला अनुसरून प्रीतम मुंडे काय संकल्प करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhagwangad Dussehra Melava: MP Pritam Munde’s rally started from Gopinath fort

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात