Poonch Encounter : जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी लष्कराची चकमक सुरू, जेसीओसह दोन जवान शहीद

JCO and one Soldier Martyered in encounter with terrorists in Poonch Encounter Jammu and Kashmir

Poonch Encounter : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मेंधर उपविभागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक जवान शुक्रवारी भिंबर गलीमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झाले. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. जेसीओसह पाच जवान शहीद झाले त्या दिवशी 11 ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. JCO and one Soldier Martyered in encounter with terrorists in Poonch Encounter Jammu and Kashmir


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मेंधर उपविभागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक जवान शुक्रवारी भिंबर गलीमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झाले. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. जेसीओसह पाच जवान शहीद झाले त्या दिवशी 11 ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

सोमवारीही पुंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली. जेसीओसह पाच जवान शहीद झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, सीमावर्ती जिल्ह्यातील पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील डेरा की गली (DKG) जवळच्या गावात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सैनिक ठार झाले. अधिकाऱ्यांच्या मते, नियंत्रण रेषा ओलांडलेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली होती.

पूंछ जिल्ह्यातील सुरक्षा दलांवर हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दोन ते तीन महिने या परिसरात होते, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. गेल्या काही दिवसांपासून जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलाने अवघ्या दोन आठवड्यांत 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बुधवारीच सुरक्षा दलाने पुलवामाच्या त्राल भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर शाम सोफी याला ठार केले.

JCO and one Soldier Martyered in encounter with terrorists in Poonch Encounter Jammu and Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात