विशेष प्रतिनिधी
बीड : Sambhaji Raje स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही. मग आताबीड मध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का? असा सवाल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.Sambhaji Raje
संभाजीराजे म्हणाले, संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली महाराष्ट्रमध्ये महाभयानक परिस्थिती झाली आहे. मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्रातील बीड पॅटर्न बिहार सारखा झाला आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. 19 दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे.
संबंधीत मंत्र्यांची मंत्री मंडळातून अजून हाकालपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न असल्याचे सांगत संभाजीराजे म्हणाले, अजित पवार परखडपणे आपलं काम, नियोजन करण्याची पद्धत दाखवत असतात. आता का संबंधितांना संरक्षण द्यायला लागले आहेत ,? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा. खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही त्यांचा राजीनामा का घेतला नाही हा आमचा सवाल आहे
बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो. स्वतः मुंडे यांच्या हातात बंदूक घेऊन फोटो आहे. हा काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. धनंजय मुंडे ला वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. त्यामुळे बीड पॅटर्न कुठं होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App