बारामतीतून निवडून कोणत्याही पवार येवोत; घरच्या किंवा बाहेरच्या, पण बारामती उरणार नाही “पवार सेंट्रिक”!!


नाशिक : बारामतीतून निवडून कोणत्याही पवार येवोत, घरच्या की बाहेरच्या येवोत, पण बारामती उरणार नाही पवार सेंट्रिक!!, हे खरे 2024 च्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे, जे फारसे कोणी चर्चेत आणत नाही. किंबहुना मराठी माध्यमे ते मुद्दामून लपवत आहेत. Baramati will not remain “pawar centric” of defeat or victory of any pawar!!

आता हेच पाहा ना… बारामती लोकसभा मतदारसंघावर आपला कब्जा टिकवून ठेवण्यासाठी शरद पवारांना आपल्या वर्षानुवर्षाच्या राजकीय शत्रूंचे उंबरठे झिजवावे लागले, तर अजित पवारांना देखील आपल्या राजकीय शत्रूंच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटलांना शब्द द्यावा लागला.

एरवी हे पवार काका – पुतणे एक असताना ते बारामतीत इतरांना बिलकुल जुमानयचे नाहीत. “बारामती म्हणजे पवार” आणि “पवार म्हणजे बारामती” हे समीकरण त्यांनी आपल्या समर्थकांच्या मनात एवढे घट्ट रुजवले होते की, पवारांचे समर्थक आणि खुद्द पवार बारामती नावाच्या पोटात आपले प्राण घालून बसले होते. आज ते प्राण अक्षरशः तडफडत आहेत आणि ती तडफड बारामती जिंकून एकमेकांना पाडण्याची आहे.

पण बारामती जिंकायला एरवी पवारांची ताकद पुरेशी होती किंबहुना पवारांखेरीज बाकी कुणाची ताकदच पवारांनी बारामतीत उरू दिली नव्हती. पण कालचक्र एवढे फिरले किंबहुना कालचक्राने एवढा मोठा दणका दिला की पवारांना अक्षरशः पायाला भिंगरी लावून बारामतीतल्या गावागावांमध्ये फिरावे लागले लागत आहे. नको – नको त्या लोकांचा परामर्श घ्यावा लागतो आहे. आपल्या 55 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत पवारांनी ज्या बारामतीच्या 40 दुष्काळी गावांकडे कायम दुर्लक्ष केले, किंबहुना त्यांना कायम दुष्काळी ठेवले त्या दुष्काळी गावांमध्ये जाऊन पवारांना नुसती पायधूळ झाडून भागले नाही, तर त्यांना तिथे शालेय विद्यार्थ्यांसमोर सभा घ्याव्या लागल्या. अनंतराव थोपटे, दादा जाधवराव यांचे उंबरठे झिजवावे लागले. अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांसकट जुन्या वैऱ्यांशी जुळवून घ्यावे लागले.हे सगळे फक्त बारामतीत भाजपच्या खेळीमुळे घडून येऊ शकले. भाजपने बारामतीची लढत स्व प्रतिष्ठेची करण्यापेक्षा दोन पवारांमध्येच एवढी प्रतिष्ठेची करून ठेवली की, जर बारामतीची लढत आपण जिंकलो नाही, तर बारामतीच्या इतिहासातले आपले नाव कायमचे पुसले जाईल, ही भीती पवारांच्या मनात निर्माण झाली आणि ही भीती निर्माण करण्याचे श्रेय निःसंशय भाजपला जाते. अन्यथा पवार काका – पुतण्यांच्या लढाईत त्यांनी चलाखीने नणंद – भावजयीची लढत लावून दिली नसती. पवार कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून इतर कोणालाही उतरवता येणे भाजपने शक्य होते, पण भाजपने ते केले नाही. अजित पवारांच्या पत्नीला उतरवून दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीची मुख्य सूत्रे आपल्या हातात ठेवली.

विजय – पराभवात पवार सोडून इतर वाटेकरी

आता बारामतीत जो कोणी पवार निवडून येईल, त्या पवार निवडून येण्याचे श्रेय हे बारामतीतले इतर घटक किंबहुना पवारांचे राजकीय शत्रू आपल्याकडे घेऊ शकतील. त्या श्रेया मध्ये आपला वाटा खात्रीने मागू शकतील. सुप्रिया सुळे जिंकल्या, तर अनंतराव थोपटेंचे खानदान त्यांच्या विजयावर आपला विशिष्ट हक्क सांगेल. तीच संधी दादा जाधवरावांना देखील मिळेल. बारामतीच्या दुष्काळी गावांमधले लोक पुढे सरसावून आमच्या मतांमुळे तुमच्या मुलीचा विजय झाला हे छातीठोकपणे पवारांना सांगू शकतील आणि पवारांना ते ऐकून घ्यावे लागेल.

त्या उलट सुनेत्रा पवार जिंकल्या, तर त्या विजयामध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिंहाचा वाटा असल्याचे अजितदादांना मान्य करावे लागेल. त्यात हर्षवर्धन पाटलांचा, विजय शिवतारेंचा मोठा वाटा असल्याचे जाहीरपणे कबूल करावे लागेल. याचा अर्थच पवारांचा बारामतीतला पवारांचा विजय किंवा पवारांचा पराभव हा “पवार सेंट्रीक” असणार नाही. त्या विजयात आणि पराभवात इतर घटक पवारांवर कुरघोडी करणे करतील आणि ही कुरघोडी पवारांना मान्य करावी लागेल.

आत्तापर्यंत बारामती पवारांच्या मुठीत होती. पवार म्हणतील ती “पूर्व”, पवार म्हणतील ती “पश्चिम” असला प्रकार बारामतीत खपवून घेतला जात होता, *पण आता बारामतीत पवार म्हणतील ती “पूर्व” असेल, तर बाकीच्या सगळ्या दिशा बाकीचे नेते म्हणतील, त्या “पूर्व” ठरतील, हे पवारांना विसरून चालणार नाही. किंबहुना त्यांना ते सत्य मान्य करावे लागेल.

बारामतीचे साखर कारखाने शरद पवारांनी आणले नाहीत. ते त्या – त्या ठिकाणच्या जुन्या जाणत्या मातब्बरांनी आणल्याची आठवण अजितदादांनी नुकतीच सांगितली. त्या जुन्या जाणत्या मातब्बरांचे वंशज खात्रीने बारामतीत पुढे येतील आणि पवारांच्या विजयात किंवा पराभवात आमचा वाटा आहे, हे छातीठोकपणे सांगतील, हे बारामती “पवार सेंट्रिक” उरली नसल्याचे सर्वांत मोठे निदर्शक असेल, जे पवारांना डांचेल, पण म्हणून वस्तुस्थिती बदलणार नाही!!

Baramati will not remain “pawar centric” of defeat or victory of any pawar!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात