घरातल्या घरातच पवारांच्या “चाणक्य खेळ्या”; बारामतीत डमी अर्ज भरण्यासाठी घरातल्याच नेत्यांना पळवा!!

More pawars may field dummy applications in baramati

विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवारांच्या घरातल्या घरातच “चाणक्य खेळ्या”; डमी अर्ज भरण्यासाठी घरातल्याच नेत्यांना पळवा!!, अशी बारामती लोकसभा मतदारसंघातली अवस्था झाली आहे. एकीकडे शरद पवार आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीसाठी बारामती तालुक्यातल्या गावोगावी फिरत आहेत. आपल्या जुन्या दुश्मनांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्याचवेळी डमी अर्ज भरण्याच्या खेळ्याही करत आहेत. More pawars may field dummy applications in baramati

एकीकडे सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाला, तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची पंचाईत व्हायला नको म्हणून अजित पवारांनी लोकसभेच्या डमी अर्ज नेल्याची बातमी आली आहे, तर त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा अर्ज बाद झाला, तर रोहित पवारांच्या आई सुनंदा राजेंद्र पवारांनी डमी अर्ज नेण्याची बातमी समोर आली आहे. एकूण पवारांच्या घरातल्या घरातच “चाणक्य खेळ्या” सुरू झाल्याच्या या बातम्या आहेत.

पवार काका – पुतणे बारामती जिंकण्याच्या इर्षेने नव्हे, तर पराभवाच्या भीतीने गर्भगळीत झाल्याची ही चिन्हे आहेत. पवार काका – पुतण्यांच्या या खेळ्या पाहून भाजपने आणखी कुठली वेगळीच खेळी करून आयत्या वेळी दोघांनाही उघडे पाडले, तर आश्चर्य वाटायला नको अशी ही चिन्हे दिसत आहेत.



बारामतीची लढत कधी नव्हे तेवढी पवारांसाठी प्रतिष्ठेची झाल्याने पवार काका – पुतणे बारामतीकरांचे अक्षरशः उंबरे झिजवत आहेत. आपल्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत पवारांनी ज्या दुष्काळी गावांना कधीच भेटी दिल्या नव्हत्या किंवा ज्यांचा दुष्काळ कधीच संपवला नव्हता, त्या कारखेल, सुपे, उंडवडी पठार असल्या गावांना पवारांना भेटी द्याव्या लागल्या आहेत. थोपटे, तावरे यांच्यासारख्या जुन्या वैऱ्यांची घरे धुंडाळावी लागली आहेत.

पण एवढे करूनही पवारांना विजयाची खात्री नसल्याने शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक अर्जाबरोबर रोहित पवारांच्या आई सुनंदा राजेंद्र पवारांचा देखील डमी अर्ज भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी आहे. तसेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा अर्ज बाद झाला, तर आपल्याकडूनही “पवार”च मैदानात हवा म्हणून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डमी अर्ज नेल्याची बातमी समोर आली आहे. आता नेमका कोणाचा अर्ज बाद ठरणार आणि कोणते पवार एकमेकांसमोर उभे ठाकणार याची चर्चा बारामतीत रंगली आहे. पण या निमित्ताने पवारांच्या घरात प्रतिस्पर्धा रंगली आहे.

आत्तापर्यंत पवारांनी इतरांची घरे फोडली असा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. पण बारामतीत पवारांच्या “चाणक्य खेळी”मुळे आपल्याच घरातल्या उमेदवारांना आधी अर्ज भरावा लागणार आणि त्यांचे अर्जाच्या रद्द ठरण्याच्या भीतीमुळे घरातल्याच दुसऱ्या उमेदवारांना डमी अर्ज भरावा लागणार असल्याची स्थिती येऊन ठेपली आहे.

More pawars may field dummy applications in baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात