लोक म्हणाले “पप्पू”; पण फडणवीस म्हणाले, राहुल गांधी…!!, “पप्पू” हे त्यांचं घरातलं नाव!!


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : लोक म्हणाले पप्पू; पण फडणवीस म्हणाले, राहुल गांधी… पप्पू हे त्यांचं घरातलं नाव!!… हा किस्सा आज सोलापुरात घडला. People said pappu, devendra fadnavis said, no he is rahul gandhi, pappu is his pet name!!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर होते. भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर मतदारसंघातले उमेदवार आमदार राम सातपुते यांचे अर्ज दाखल करण्यासाठी फडणवीस सोलापुरात आले होते. निंबाळकर आणि सातपुते या दोन्ही उमेदवारांनी भव्य रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केले.

ते अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या रॅलीत फडणवीस यांचे भाषण झाले. या सभेत बोलताना पडणावीस म्हणाले, देशाची लोकसभेची निवडणूक ही देशाचा पंतप्रधान ठरवण्यासाठी होणार आहे. तुम्हाला पंतप्रधान कोण हवा आहे??, नरेंद्र मोदी की राहुल गांधी??, हा सवाल आहे. नरेंद्र मोदी हे आमच्या गाडीचे इंजिन आहेत. आम्ही बाकी सगळे डबे आहोत. पण समोर राहुल गांधी स्वतःला इंजिन म्हणतात, शरद पवार स्वतःला इंजिन म्हणतात, त्यांच्याबरोबरच ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, स्टालिन हे सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात.

आमच्या गाडीला डबे आहेत. त्या डब्यांमध्ये सर्वसामान्य लोकांना बसायला जागा आहे. या गाडीत दिन दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, सर्व समाज घटक येऊन बसू शकतात, पण राहुल गांधींच्या गाडीत फक्त इंजिने आहेत. त्या इंजिनांमध्ये त्यांचेच परिवार येऊन बसले आहेत. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या इंजिनात बसायला जागाच नाही. त्यामुळे लोकांनी ठरवायचे कोणाला निवडून द्यायचे?? कमळाचे बटन दाबले तर कोणाला मत जाईल??, असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला. त्यावर उपस्थित असलेले लोक म्हणाले, मोदींना!!… आणि हाताच्या पंजाचे बटन दाबले किंवा तुतारीचे बटन दाबले, तर कोणाला मत जाईल??, असे विचारल्यावर लोक म्हणाले, पप्पूला…!!… तेव्हा लगेच फडणवीस म्हणाले, “पप्पू” नाही, राहुल गांधी!!… “पप्पू” हे त्यांचे खास घरातले नाव आहे. त्यामुळे आपण त्यांना “पप्पू” म्हणायचे नाही. ते राहुल गांधी आहेत, असा टोमणा फडणवीसांनी हाणला. त्यावर सभेत प्रचंड हशा पिकला. त्यानंतर फडणवीस यांनी इतर विषय काढून सभा गाजवली.

People said pappu, devendra fadnavis said, no he is rahul gandhi, pappu is his pet name!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात