प्रतिनिधी
पुणे : मेळघाटातील संपूर्ण बांबू केन्द्राचे काम अविरत चालावे. त्या करीता पहिला टप्पा म्हणून सुनील देशपांडे मित्र परिवाराने मदतीचे आवाहन केले आहे. यात ते म्हणतात की, आपण सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र परिवाराला खालील आवाहन करावे. गरज असल्यास आपल्या नातेवाईकांना हे आवाहन करताना स्वतःचे नाव राघवेंन्द्र देशपांडे या नावाखाली लिहावे. Bamboo kendra founder sunil deshpane friend circle appeals to society for help
आवाहन मेळघाटातील आपल्या बांधवांकरीता
कोविड महामारीची दुसरी लाट पार खेडोपाडी पोहोचली आहे. त्या लाटेच्या तडाख्यातून मेळघाटातला आदिवासी बांधवही सुटला नाही. गेल्या एक दीड वर्षात तिथल्याही अर्थचक्राला खीळ बसली आहे.
हे ध्यानात घेऊन आम्ही तिथे ३००० कुटुंबीयांना जीवनावश्यक किराणा सामग्री किट पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. एका किटची किंमत १००० रुपये असून त्यात तिथल्या आवश्यकतेनुसार आवश्यक वस्तूंचा समावेश असेल. संपूर्ण बांबू केंद्र, लवादा यांच्या माध्यमातून हे किट आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवले जातील.
संपूर्ण बाबू केंद्राचे संस्थापक कै. सुनील देशपांडेयांच्या प्रथम मासिक स्मृतीदिनी या किटचे वाटप करण्याचा मनोदय आहे. या कामी अधिकाधिक सहयोग द्यावा हे आवाहन…!!
आपण आपले योगदान खालील बँकेत पाठवावे
Sampoorna Bamboo Kendra Bank of Maharashtra Saving A/c.no.60276946013 IFSC Code MAHB0000675 Br.Shaniwar peth,Pune
– सेवावर्धिनी संस्था व मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे
श्री. प्रमोद कुलकर्णी : 94235 80535 ( CEO सेवावर्धिनी )
श्री. राजेन्द्र हिरेमठ : 98220 46604 ( उपाध्यक्ष , जनसेवा बँक)
– अधिक माहितीकरीता राघवेंन्द्र देशपांडे – 98220 87381
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App