Ayushman Bharat Digital Mission: ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या ‘आभा’ आरोग्य कार्ड कसे काढावे माहीत आहे का?


सर्व नागिराकांसाठी हे हेल्थकार्ड आवश्यक असणार आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा)चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला असून, राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक असल्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.  Ayushman Bharat Digital Mission Do you know how to get Abha health card online at home

तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरी ही तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड कसे काढावे ते जाणून घेऊ या.

 

स्टेप 1:  आभा कार्ड बनविण्यासाठी तुम्हाला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in  वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: नंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायविंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.

नोट – जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ड्रायविंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.

स्टेप 3: पुढच्या पेज वर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा चेक करून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: आत्ता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल.

स्टेप 6: पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ नंबर तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा नंबर ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार नंबर असतो तसा. हा 14 अंकी नंबर लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm

त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7: आत्ता तुम्हाला तुमचे आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA नंबर, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.

स्टेप 8: आत्ता लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA नंबर किंवा तुमचा मोबाइल नंबर आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9: आत्ता तुम्हाला OTP साठी कोणत्या मोबाइल नंबरवर OTP पाठवावा ते विचारले जाईल 1) आधार लिंक मोबाइल नंबर 2) ABHA नंबर लिंक मोबाइल नंबर. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 10: पुढच्या पेज वर तुमचे ABHA नंबर कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

स्टेप 11: जर कार्ड मध्ये काही माहिती चुकलेली असेल तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑपशन वर क्लिक करा. आणि उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.

या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Ayushman Bharat Digital Mission Do you know how to get Abha health card online at home

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात