स्पीकरच्या माध्यमातून लोकांना सतत घरात राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
विशेष प्रतिनिधी
हरियाणा : येथील नूहमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर येत आहे. पोलीसही घटनास्थळी हजर आहेत. ब्रिज मंडळाच्या यात्रेदरम्यान ही दगडफेक आणि गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. In Haryanas Nuh procession chaos vehicles vandalized internet shut down Article 144 enforced
मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली आहे. ज्यामध्ये गुरुग्राममधील शेकडो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते नलहद शिव मंदिर मेवात येथे भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी गेले होते.
या घटनेनंतर नूहमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी इंटरनेट सुरू आहे. नोहामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. एक हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्पीकरच्या माध्यमातून लोकांना सतत घरात राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
#WATCH | Aftermath of clash that broke out between two groups in Haryana's Nuh today. pic.twitter.com/yyVp10Hwzr — ANI (@ANI) July 31, 2023
#WATCH | Aftermath of clash that broke out between two groups in Haryana's Nuh today. pic.twitter.com/yyVp10Hwzr
— ANI (@ANI) July 31, 2023
गुरुग्राम विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस यशवंत शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रा शिवमंदिर नल हुड येथे पोहोचताच काही समाजकंटकांनी यात्रेवर दगडफेक सुरू केली आणि जाळपोळ केली, अनेक वाहनांची तोडफोड केली. या गोंधळादरम्यान गोळीबारापासून ते जाळपोळीपर्यंतच्या घटना घडल्या. अनेक सरकारी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली तर काही खासगी वाहनांनाही जमावाने लक्ष्य केले. हे प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून अनेक ठिकाणी तुरळक घटना घडत आहेत. या घटनेनंतर नूह-होडळ रस्त्यावरून हा मार्ग वळवण्यात आला आहे या घटनेनंतर बहुतांश बाजारपेठ बंद झाली असून लोक आपापल्या घरी गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more