प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली का नाही?? शरद पवारांनीच फूस लावल्यामुळे अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले वगैरे बाता मारून काका – पुतणे आत्तापर्यंत नेमके कोण कोणाकडे अशा आमदारांची संख्या झाकून ठेवत होते, पण निवडणूक आयोगाने कायदेशीर पातळीवर कारवाई सुरू करताच आत्तापर्यंत “झाकून” ठेवलेले शेवटी “लिहून” द्यावे लागले. Ajit pawar defeats sharad pawar in number game, retain 40 mlas
त्यामुळेच आमदार संख्येत अजितनिष्ठ राष्ट्रवादीने शरदनिष्ठ राष्ट्रवादीवर मात केल्याचे स्पष्ट झाले. अजितनिष्ठ 9 मंत्र्यांवर आणि 31 आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करा, असा अर्ज शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला 8 सप्टेंबरला सादर केला. याचा अर्थ अजित पवार गटाकडे 40 आमदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शरद पवारांनी आपली मूळ राष्ट्रवादी अजित पवारांकडे सरेंडर केली याचाही दाखला मिळाला.
आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे काका – पुतणे सत्ताधारी आणि विरोधक असा उंदीर मांजराचा खेळ खेळत होते, पण प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या कायदेशीर कारवाई पुढे हा उंदीर मांजराचा खेळ फार काळ पुढे चालवता येणार नाही हे दिसताच, पवारांनी निवडणूक आयोगाला सगळे लिहून दिले.
निवडणूक आयोगात अर्ज
निवडणूक आयोगात अजित पवार गटाने केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले. उलट अजितनिष्ठ 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल केली. यामुळे अजित पवारांच्या गटात एकूण 40 आमदार असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे G-20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कार्यालय आज बंद होते. पण तरीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलने उत्तर दाखल केले. यात 9 मंत्र्यांबरोबरच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. 31 आमदारांमध्ये विधान परिषदेतले 4 आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन महिन्यानंतर उत्तर
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे.
पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर
शरद पवार गटाकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच आमदारांचा आकडा समोर आला आहे. 9 मंत्र्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मात्र आता 31 आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहे. अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता, तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. 2022 मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याचे देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.
निर्णय आमच्या बाजूने
सुनिल तटकरे म्हणाले की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. शरद पवार गटाने कितीही दावे फेटाळले तरी त्याने कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, ते पाहता निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App