शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रवक्तेपद गमाविल्यावर उपरती झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवा असं आपण कधीही म्हटले नाही, असा यू टर्न त्यांनी घेतला आहे. After losing the post of spokesperson, Sanjay Raut said that he did not say to make UPA president Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रवक्तेपद गमाविल्यावर उपरती झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवा असं आपण कधीही म्हटले नाही, असा यू टर्न त्यांनी घेतला आहे.
‘यूपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही. यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची अशी भूमिका आहे. सोनिया गांधींचीही तशीच भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व केलं.
पण सध्या त्यांची प्रकृती खराब असते. देशात अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज यूपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे. यूपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे असे वक्तव्य संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात केले होते.
मात्र, त्यामुळे कॉँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी त्यांना फटकारले होते. कॉँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या शुक्रवारी होणाºया बैठकीतही हा विषय निघणार होता. त्यामुळे शिवसेनेने अरविंद सावंत यांना मुख्य प्रवक्ते बनवून राऊत यांना चांगलाच दणका दिला. त्यानंतर मात्र राऊत यांनी यू टर्न घेतला.
राऊत म्हणाले,विरोधी आघाडी आणखीन मजबूत होण्याची गरज आहे. यासाठी सर्व विरोधी दलांनी राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत महाआघाडी उभारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावर आपण जोर दिला होता. मी केवळ विरोधी महाआघाडी मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी मी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची कोणत्याही पद्धतीनं निंदा केली नाही’ असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
आणखी बातम्या वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App