पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांनाच धमकावले, जेलमध्ये टाकण्याची दिली धमकी


विकासाच्या कामातही राजकारण आणण्याची सवय असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्याने ग्रामस्थांनाच धमकावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विकास कामांसाठी भेट घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना त्यांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे.The Guardian Minister threatened the villagers, threatening to throw them in jail


विशेष प्रतिनिधी 

बुलडाणा: विकासाच्या कामातही राजकारण आणण्याची सवय असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्याने ग्रामस्थांनाच धमकावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विकास कामांसाठी भेट घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना त्यांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी गावकºयांना धमकावल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील चांगेफळ येथे हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आला आहे.



या व्हीडिओत राजेंद्र शिंगणे गावकऱ्यांना धमकावताना दिसत आहेत. काही गावकरी त्यांच्याकडे समस्या घेऊन आले होते. तेव्हा राजेंद्र शिंगणे यांना त्या गावकऱ्यांना फैलावर घेतले. मायच्या इमानदारीने बोला , तुम्हाला सरपंचाने पाठविले आहे का माझ्याकडे ?, मायच्या इमानदारीने बोला.. नाहीतर सवार्ना जेलात घालीन, असे शिंगणे यांनी म्हटल्याचे व्हीडिओत ऐकायला येत आहे.

चांगेफळ येथील काही नागरिक हे गावांतील मातंग समाजच्या स्मशानभूमी संदर्भात समस्यांचे निवेदन घेऊन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेले होते. या स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यात यावे,

अशी मागणी नागरिकांनी केली. तेव्हा शिंगणे यांनी उद्धटपणाची वागणूक देत तुम्हाला सरपंचाने माझ्याकडे पाठविले का? असा सवाल केला आहे. आता राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

The Guardian Minister threatened the villagers, threatening to throw them in jail

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात