राष्ट्रवादीची विदर्भ यात्रा आणि अजित पवारांचा निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सध्या पक्षवाढीसाठी विदर्भ यात्रा सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठिकठिकाणी फिरत आहेत. मात्र, विदर्भातील विविध ठिकाणी घेतलेल्या बैठकांत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. NCP’s Vidarbha Yatra and Ajit Pawar’s attempt to rely on funds


विशेष प्रतिनिधी

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने सध्या पक्षवाढीसाठी विदर्भ यात्रा सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठिकठिकाणी फिरत आहेत. मात्र, विदर्भातील विविध ठिकाणी घेतलेल्या बैठकांत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांच्या डीपीसीची राज्यस्तरीय बैठक सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. बैठकीत वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. विशेष म्हणजे दोघेही कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे अजित पवार आपल्या निधीला कट लावण्याच्या विचारात असल्याचे दिसल्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

पवारांनी समन्यायी निधी वाटपाचे सूत्र समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी काही जिल्ह्यांच्या निधी वाटपावर बोट ठेवले. शेवटी काँग्रेसचे पालकमंत्री खोलात जात असल्याचे पाहून पवारांनी नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरच्या डीपीसीच्या निधीचा निर्णय मुंबईत घेण्याची घोषणा करीत मार्ग काढला.

अमरावती येथील बैठकीत विदभार्चा अनुशेष भरून निघावा यासाठी केलेल्या निधीच्या मागणीवरून अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वाद झाला. आपण सरकारचा एक भाग असल्याने काही बोलू शकणार नाही. मात्र, विदभार्चा अनुशेष भरून निघावा यासाठीच आपण अधिक निधीची मागणी केली होती. ही मागणी असताना निधी मात्र वाढवून देण्यात आला नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

NCP’s Vidarbha Yatra and Ajit Pawar’s attempt to rely on funds

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*