कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यावर अब्दुल सत्तार यांनी कॉँग्रेसला मराठवाड्यातून संपविण्याचा पण केला आहे. औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केलाय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी हाती शिवबंधन बांधलं. नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते.Shiv Sena leader Abdul Sattar’s correct program of the Congress, the newly elected president of the District Bank
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यावर अब्दुल सत्तार यांनी कॉँग्रेसला मराठवाड्यातून संपविण्याचा पण केला आहे. औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी हाती शिवबंधन बांधलं. नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते.गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.
जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्था ताब्यात आल्यामुळे शिवसेनेचं बळ अधिक वाढलं आहे. आता जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देत सत्तार यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कॉँग्रेसला दणका दिला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. मात्र स्वत: बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App