भाजपद्वेषाने पछाडलेल्यांनो तोंडावर आपटण्याशिवाय दुसरं काही वाट्याला येणार नाही – केशव उपाध्ये

  • उद्धव ठाकरेंची अवस्था तर मतदारांनी आता वर्ल्डकपमधील इंग्लंडच्या संघासारखी केलीय. असा टोलाही लगावला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी लागले आहेत. यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटाला यश मिळालं आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीचं पारडं हे महाविकास आघआडीच्या तुलनेत भारी ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी सर्वच विरोधकांना जारदार टोले लगावले आहेत.After BJPs success in Gram Panchayat elections, Keshav Upadhye criticized the opponents



केशव उपाध्ये म्हणातात, ‘’भाजपद्वेषाने पछाडलेल्यांनो, तुम्ही कितीही खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा. तोंडावर आपटण्याशिवाय दुसरं काही वाट्याला येणार नाही.’’

याशिवाय ‘’सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचा रतीब लावला असताना मतदार देवेंद्रजींच्या पाठिशी ठाम राहिले. आणि शरद पवार पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात व्यस्त असताना, मोदींनी सुद्धा ग्रामविकासाच्या योजनांना ग्रामीण महाराष्ट्र पसंती देताना दिसला. बारामती सुध्दा गेलं.’’ असं ते म्हणाले.

‘’नाना पटोले बिनबुडाचे टीका करत राहिले आणि जनतेने जिल्ह्यातही पटोलेंना सपशेल नाकारले. तर, उद्धव ठाकरेंची अवस्था तर मतदारांनी आता वर्ल्डकपमधील इंग्लंडच्या संघासारखी केलीय. यापेक्षा तळाला आणखी जाणार तरी किती? ‘’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत.

After BJPs success in Gram Panchayat elections, Keshav Upadhye criticized the opponents

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात