‘’… आणि शरद पवारांना पुन्हा ‘भावी’ पंतप्रधान होण्याची झाली घाई’’ केशव उपाध्येंनी साधला निशाणा!


‘’बैठकांबाबत सूचना किंवा सल्ले देण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे.’’, असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. सरकारच्यावतीने विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली आणि हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. दरम्यान, एरवी जातीय तेढ आणि सांप्रदायिकता हे मुद्दे मांडून भाजपाला लक्ष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचा पक्ष या बैठकीस अनुपस्थित होता. यावरून आता भाजपाने पवारांवर निशाणा साधला आहे. BJP criticizes Sharad Pawars absence from Union Home Minister Amit Shah’s meeting regarding Manipur riots

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, ‘’खरोखर जातीय दंगलींबाबत गांभीर्य असते, तर शरद पवार यांनी गृहमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, त्यांना पाटणा येथील सर्वपक्षीय बैठकीची आणि पुन्हा ‘भावी’ पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे.’’

याशिवाय ‘’बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळल्याने बैठकांबाबत सूचना किंवा सल्ले देण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे. जातीय तेढ आणि सांप्रदायिकता हे मुद्दे मांडून विनाकारण भाजपाला ‘लक्ष्य’ करण्याचा पवार यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.’’ असंही केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वार म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत समाजवादी पार्टीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

या बैठकीला भाजपसह १८ राजकीय पक्ष आणि ईशान्येतील चार खासदार आणि ईशान्येचे दोन मुख्यमंत्री उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा आणि आरजेडीने बैठकीत मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचवेळी द्रमुकने महिला आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर लोकांना वेगळे करण्यासाठी बळाचा वापर करू नये, अशी सूचना काँग्रेसने केली.

BJP criticizes Sharad Pawars absence from Union Home Minister Amit Shahs meeting regarding Manipur riots

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात