Shinde group : दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा; शिंदे गटाची मागणी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

Shinde group

प्रतिनिधी

मुंबई : Shinde group दिशा सालियान हिचे आई-वडील यांनी काल पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या खूनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरेंचा थेट संबंध असल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला असून आता आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का असा सवाल त्यांनी केला आहे.



दिशा प्रकरणातील एसआयटीने सुशांत केसची चौकशी करावी- कदम

राम कदम म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात अजूनही एसआयटी ओपन आहे. त्यात चौकशी होत असताना सुशांत प्रकरणातील ठाकरे सरकारचा रोल यावर चौकशी झाली पाहिजे. बिहारच्या पोलिसांनी कुणी अडविले. सुशांत सिंग राजपूतच्या फ्लॅटची त्यांच्या आत्महत्येनंतर उद्धव ठाकरे सरकारने रंगरंगोटी केली आणि मुळ मालकाला परत केला. पहिल्या दिवसापासून हे प्रकरण चौकशीसाठी त्यांनी सीबीआयला का दिले नाही. बिहार पोलिसांना चौकशी का करु दिली नाही. उद्धव ठाकरे सरकारने सुशांतचे प्रकरण हे सीबीआयला तेव्हा दिले जेव्हा पुरावे नष्ट केले.

चौकशी अहवालातून सत्य समोर- देसाई

शंभुराज देसाई म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडीलांनी जी अधिकची माहिती पोलिसांना दिली त्याचा संदर्भ सुशात केसशी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला सांगितले होते की कुणावरही अन्याय करायचा नाही. माता-भगिणींवर तर बिलकूल नाही. त्यामुळे आम्हाला आजही ती शिकवण आहे. आम्ही सीबीआयला चॅलेज करत नाही. आपण जर काही केले नसेल तर चौकशी करू नका असे म्हणणे योग्य नाही. चौकशी अहवालात सत्य समोर येईल.

अज्ञांनी लोकांनी बोलू नये, राणेंचा सरदेसाईंना टोला

नीतेश राणे म्हणाले की, सीबीआयने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी जो रिपोर्ट दिला आहे तो कोर्टाने अजून स्वीकारलेला नाही. आरुषी तलवार केसमध्येही तसेच झाले आणि कोर्टाने तो नाकारला, पुढे ती केस पुन्हा ओपन झाली आणि शिक्षा झाली. अज्ञानी लोकांनी यांच्यावर बोलू नये. त्यांनी शिकून घ्यावे आणि मग यावर बोलले पाहिजे.

नेमके कुटुंबियांचे म्हणणे काय?

मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर या प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे आणि तेच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले आहे. त्यांनी मुंबई पोलिसकडे आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, अभिनेता सूरज पंचोली व त्यांचे अंगरक्षक, माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे आणि रिया चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.दरम्यान, उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असताना सतीश सलियन यांनी मुंबई पोलिसात तक्रार केल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात,असे सतीश सलियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी सांगितले. एनसीबीच्या चौकशी अहवालाचा हवाला देत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. ही माहिती मुंबई पोलिसांना लेखी तक्रारीत देण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये होणार सुनावणी

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी पत्रकारांना सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयितांना वाचवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Aditya Thackeray should be tested for narco in Disha Salian case; Shinde group demands Aditya Thackeray’s resignation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात