विशेष प्रतिनिधी
मुंबई: बलात्कारितेची ओळख उघड केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, अभिषेक बच्चनसह 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल झाला आहे.2019 मध्ये हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरण व त्यानंतर आरोपींना घटनास्थळी नेल्यानंतर त्यांचे एन्काऊंटर प्रकरण देशभर गाजले होते. पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याने पीडितेची ओळख पटल्याने बदनामी झाली.या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्यांसह 38 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.Actor Salman Khan, Akshay Kumar, Ajay Devgn, Abhishek Bachchan and 38 other celebrities have been charged for disclosing rape vicktims identity
यासंदर्भात दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी तक्रार दाखल केली होती. यामध्ये बॉलिवूड स्टारसह टॉलिवूड ऍक्टर्स, क्रिकेटर्स व आरजे यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, अनुपम खेर, परिणिती चोपडा, दीया मिर्जा, स्वरा भास्कर, रकुल प्रीत सिंह, यामी गौतम, रूचा चड्ढा, काजल अग्रवाल, शबाना आजमी, हंसिका मोटवानी, प्रिया मलिक, अरमान मलिक, करणवीर वोहरा, डायरेक्टर मधुर भंडारकर, दक्षिणेतील ऍक्टर रवी तेजा, अल्लू शिरीष, क्रिकेटर हरभजन सिंह, शिखर धवन, नीधी अग्रवाल, चार्मी कौर, आशिका रंगनाथ व आरजे साईमा यांचा समावेश आहे.
हैदराबाद येथे 28 नोव्हेंबर 2019 रोजी एका व्हेटरनरी महिला डॉक्टरचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तिची जाळून हत्या केली होती. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी यातील आरोपींना पोलिसांनी पकडले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या आरोपींना घटनास्थळावर नेले होते.
दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून पळून जात होते म्हणून पोलिसांनी यातील चारही आरोपींचे एन्काऊंटर केले होते. या संपूर्ण प्रकरणाला दिशा रेप केस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं होतं व त्यातून यातील पीडितेची ओळख पटली होती, त्यामुळे हे गुन्हे दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App