उत्तर प्रदेशच्या निवडणुकांबद्दल ओवैसींचा मोठा दावा, म्हणाले – 100 जागा लढू आणि जिंकू, इतर पक्षांवर केली आगपाखड

Asaduddin Owaisi claim about UP Assembly elections says AIMIM will fight on hundred seats and win

UP Assembly Elections : अयोध्या दौऱ्यापूर्वी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ते उत्तर प्रदेशमध्ये 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत, या जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, 60 वर्षांपर्यंत इतरांना जिंकवले, आता आम्ही जिंकू. Asaduddin Owaisi claim about UP Assembly elections says AIMIM will fight on hundred seats and win


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : अयोध्या दौऱ्यापूर्वी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ते उत्तर प्रदेशमध्ये 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत, या जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, 60 वर्षांपर्यंत इतरांना जिंकवले, आता आम्ही जिंकू.

उत्तर प्रदेश निवडणुकीत सपा-बसपासोबत युती करण्याच्या प्रश्नावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की “आधी सपा-बसपाला आमच्यासोबत युती करण्यासाठी येऊ द्या. आम्ही त्यांच्याशी बोलण्यास तयार आहोत. त्यांनी आधी बोलायला हवे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला लक्ष्य करत ओवैसी म्हणाले की, सर्व पक्षांनी फक्त मुस्लिमांचा वापर केला. सपा-बसपा युती असूनही भाजपने बाजी मारली. यूपीतील मुस्लिमांची अवस्था वाईट आहे.

यावेळी यूपीचे बाहुबली म्हणवले जाणारे नेते अतिक अहमद यांची पत्नी शायस्ता परवीन यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. ओवैसी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

फैजाबाद लिहिलेल्या पोस्टरवर पोलिसांनी स्टिकर लावले

अयोध्येत ओवेसींच्या जाहीर सभेत पोलिसांनी फैजाबाद लिहिलेल्या पोस्टरवर स्टिकर लावला आहे. पोलीस पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे नाव बदलले आहे, त्यामुळे फैजाबाद लिहिण्याची गरज नाही. ओवैसी यांनी अयोध्याला फैजाबाद म्हटले म्हणून मुस्लिम समाजदेखील संतप्त आहे. लोकांनी सांगितले की, आम्ही कायद्याचे पालन करणारे लोक आहोत, ओवैसी हे मुस्लिम समाजाचे ठेकेदार नाहीत. ते नेहमी हिंदू आणि मुस्लिमांमधील संघर्षाविषयी बोलतात.

दुसरीकडे, यूपीचे मंत्री ब्रिजेश पाठक यांनी मायावतींच्या प्रबुद्ध संमेलन आणि ओवैसी यांच्या अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सावन भादोच्या पावसाप्रमाणे विरोधी पक्ष अखेरीस जोर धरतो. टिळा लावलेले छद्म ब्राह्मण बसपाच्या कार्यक्रमात सामील आहेत. मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनीही ओवैसींना लक्ष्य केले आणि म्हटले की, ओवैसी असो की भाजप, दोघेही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात. आता लोकांना समजले आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

Asaduddin Owaisi claim about UP Assembly elections says AIMIM will fight on hundred seats and win

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण