Parambir Singh Case : चांदीवाल आयोगाने माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जारी केले वॉरंट, डीजीपींना दिले पोहोचवण्याचे आदेश

Parambir Singh Case Chandiwal Commission issues warrant against former commissioner Parambir Singh

Parambir Singh Case : चांदीवाल आयोगाने महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगाने 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींना हे वॉरंट देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. Parambir Singh Case Chandiwal Commission issues warrant against former commissioner Parambir Singh


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चांदीवाल आयोगाने महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगाने 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींना हे वॉरंट देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात चांदीवाल चौकशी आयोगासमोर परमबीर सिंह हजर झाले नाहीत. यासंदर्भात आयोगाने सिंह यांच्याविरोधात कडक भूमिका घेतली होती, आयोगाने म्हटले होते की, सिंह पुढील सुनावणीत हजर झाले नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले जाईल.

100 कोटी वसुलीचा आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे निर्देशही दिले. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाच्या माध्यमातून आरोपांची समांतर न्यायिक चौकशी सुरू केली आहे. चौकशी आयोगाने सिंह यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

ईडीकडून देशमुखांशी संबंधित लोकांची चौकशी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग, लाचखोरी आणि इतर आरोपांवर नोंदवलेल्या प्रकरणाचा तपास वाढवला आहे. याअंतर्गत आता ईडी लवकरच त्यांच्याशी संबंधित आणखी काही लोकांची चौकशी करेल. ईडीकडून करण्यात येत असलेली चौकशी 100 कोटी रुपयांच्या कथित लाचखोरी आणि खंडणी रॅकेटशी संबंधित आहे, ज्यामुळे देशमुख यांना एप्रिलमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

ईडीने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनाही समन्स बजावले होते, परंतु ते त्यांच्या जबाबदारीचा हवाला देत हजर झाले नाहीत. 56 वर्षीय परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत, त्यांनी एजन्सीसमोर हजर होण्यासाठी पंधरवड्याची मुदत मागितल्याचे समजते.

Parambir Singh Case Chandiwal Commission issues warrant against former commissioner Parambir Singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात