Modi Express : गणरायाची आरती म्हणत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद, १८०० जणांसह मुंबईहून सावंतवाडीला मोदी एक्स्प्रेस रवाना

Modi Express Carrying 1800 Passengers Departed From Mumbai To Sawantwadi Watch Video

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केलेल्या घोषणेप्रमाणे आज पहिली मोदी एक्सप्रेस मुंबईहून सावंतवाडीला रवाना झाली आहे. या रेल्वेत तब्बल १८०० गणेशभक्त होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. दादर स्थानकावरून ही रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या दिशेने रवाना झाली. रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांनी गणरायाची आरती म्हणत आनंद व्यक्त केला. या मोदी एक्स्प्रेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Modi Express Carrying 1800 Passengers Departed From Mumbai To Sawantwadi Watch Video


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केलेल्या घोषणेप्रमाणे आज पहिली मोदी एक्सप्रेस मुंबईहून सावंतवाडीला रवाना झाली आहे. या रेल्वेत तब्बल १८०० गणेशभक्त होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. दादर स्थानकावरून ही रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या दिशेने रवाना झाली. रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांनी गणरायाची आरती म्हणत आनंद व्यक्त केला. या मोदी एक्स्प्रेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, “मोदीजींच्या संकल्पनेतून आम्ही कोकणवासीयांसाठी २२५ रेल्वे सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासीय खुश आहेत,”

तत्पूर्वी, मोदी एक्स्प्रेसची घोषणा करताना गत महिन्यात नितेश राणे म्हणाले होते की, “दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत.”

हे रेल्वे दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत जाणार आहे. चाकरमान्यांनी या मोदी एक्स्प्रेसबद्दल मोठा आनंद व्यक्त केला आहे. प्रवासाची सुरुवात त्यांनी गणेशाच्या आरतीने केली. दरम्यान, या प्रवासात सर्वांना एक वेळचं जेवणही दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Modi Express Carrying 1800 Passengers Departed From Mumbai To Sawantwadi Watch Video

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण