ईडीच्या कारवाया राज्यांच्या अधिकारावर गदा, संसदेत मुद्दा मांडणार, शरद पवार यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने राज्यातील महाविकास आघाडीच्या मागे चौकशांचे सत्र सुरू केले आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे सांगितले आहे.ED’s actions are enchrochment on rights of states, Sharad Pawar warns will raise this issue in Parliament



पवार म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला असेल, त्यासाठी आपल्या देशामध्ये कमिशन आहेत. याविषयी या कमिशनकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचे गृह खाते देखील येथे आहे. येथे तपासाची यंत्रणा आहे, तरीही ईडीने त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे हे एका अर्थाने राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणे आहे. अशा कारवायांची अनेक उदाहरणे सध्या ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू.

पवार म्हणाले की, ‘गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झालेली आहे. या यंत्रणांचे नाव म्हणजे ईडी आहे. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या 3-4 संस्था आहेत. 3 शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. या संस्थांचा व्यवहार देखील 20-25 कोटींच्या आतीलच आहे. मात्र, तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत आहेत.

ED’s actions are enchrochment on rights of states, Sharad Pawar warns will raise this issue in Parliament

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात