Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.Devendra Fadnavis

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा या विभागांच्या सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी १०० दिवसांचा आराखडा आणि प्रमुख योजनांची स्थिती मांडली. या बैठकीत परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्याकडील असलेल्या विभागांची बैठक मंत्रालयात घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपदाचे सूत्र हाती घेताच मंगळवारी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या या दोन्ही विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच करसंकलन आणि महसूलवाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याचे निर्देश अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या.

100 days action plan of Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात